महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, चंद्रकांत पाटलांचा दावा

135

राज्याच्या विधान परिषदेच्या 10 जागांची निवडणूक सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत उत्सुकता लागली आहे. त्यामुळे विधान परिषदेत विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं आजच्या मतदानानंतर महत्वाचं असणार आहे. यामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.

(हेही वाचा – IRCTC : जगन्नाथ यात्रेला जायचंय? भारतीय रेल्वे देतंय कमी बजेटमध्ये फिरण्याची संधी)

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी आज 11 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे आज भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर दिसणार आहे. भाजपची बस विधानसभेत दाखल झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

पूर्ण आत्मविश्वासाने आम्ही आता मतदानासाठी आलो आहोत. भाजपचे उमेदवार 100 टक्के विजयी होतील. या निवडणुकीची रणनिती राज्यसभा निवडणुकीवेळीच आखण्यात आली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात केली. आजही तिच रणनिती मोठ्या प्रमाणात आखली जाईल. यावर फडणवीस यांची रणनिती नक्कीच मात करेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, कोणता ते आम्हाला माहित नाही, असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांना केला आहे.

पाचव्या उमेदवारांना अतिरिक्त मतांची गरज आहे, ती मतं त्यांना मिळणार का असा सवाल केल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्याप्रमाणे राजसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवारासाठी मतं मिळाली. त्याचप्रमाणे आम्हाला या निवडणुकीत सुद्धा मतं मिळतील. महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल. परंतु कोणत्या पक्षाचा हे मला माहिती नाही

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.