‘विश्वासघातानं गेलेलं सरकार पुन्हा एकदा आणता येईल’

राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकासाठी कोल्हापुरातून आज अमल महाडिक उमेदवारी दाखल करणार आहेत. यावेळी अमल महाडिक यांच्या विजयाचा दावा करताना, पाटील यांनी सूचक विधान केले आहे. ‘देशात आगामी काळातही मोदींचीच सत्ता असणार आहे. ज्या राज्यकर्त्याला भविष्य कळतं त्या व्यक्तीला हे कळेल. विश्वासघातानं गेलेलं सरकार पुन्हा एकदा मेहनतीने आणता येईल. नवीन वर्षात ते सरकार येईल. यापुढच्या राजकारणाला अधिक वेग येईल,’ असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचेचं प्राबल्य 

सहा वर्षांपू्र्वीची आणि आताची परिस्थिती यात फरक आहे. आवडे आणि कोरे मागच्यावेळी आमच्यासोबत नव्हते. आता ते आमच्यासोबत आहेत. या निवडणुकीतच नाही, तर जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आमच्यासोबत आहेत. नवीन तयार झालेल्या नगरपालिकांमध्ये भाजपचं प्राबल्य आहे. १०५ भाजप तर कोरे आणि आवडे यांचे मिळून १६५ सदस्य होतात. बाकीची जुळवाजुळव सोपी आहे. कमी पडणारी ४३ मतं यायला काही अडचण येणार नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपची माघार 

सातव यांच्या घरात उमेदवारी गेली त्यामुळं आम्ही आमचा संजय केनेकरांचा अर्ज आज मागे घेत आहोत. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह होता. सातव यांच्या पत्नीला उमेदवारी मिळायला हवी ती किमान आता विधान परिषदेला मिळाली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 (हेही वाचा : लग्न सराईतील जेवणाची पंगतही महागली! ताटाची किंमत ‘इतकी’ झाली )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here