राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
दादांची दिलगिरी
ओबीसी आरक्षणावरुन भाजपकडून करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह भाषेत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. घरी जा, भाक-या भाजा अशा शब्दांत त्यांनी सुळे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहीत याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
(हेही वाचाः राणा दाम्पत्याच्या मागे गुन्ह्यांची ‘साडेसाती’, आणखी एक गुन्हा दाखल)
काय आहे पाटलांच्या पत्रात?
जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या विधानसभेत 12 महिला आमदार आणि लोकसभेत 5 महिला खासदार आहेत. त्यामुळे मला सुप्रिया सुळे यांच्याबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही. ओबीसींना आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या विधानामुळे सुप्रिया सुळे यांचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असे पत्र लिहीत चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.
चाकणकर यांची स्पष्टता
राज्य महिला आयोगाकडून या विधानाचा खुलासा करणारे पत्र चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आले होते. दोन दिवसांत त्याचा खुलासा करण्यास आयोगाकडून त्यांना सांगण्यात आले होते. त्यांनी दिलग्री व्यक्त केल्यामुळे आयोगाच्या बाजूने हा मुद्दा संपलेला आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः अनिल परबांच्या घोटाळ्याची CBI चौकशी व्हावी, सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका)
Join Our WhatsApp Community