एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असताना, राष्ट्रवादीत लवकरच मोठी फूट पडणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
( हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी प्रयत्न )
बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार, खासदार भाजपा आणि शिंदे गटात जाऊ नयेत, यासाठी खटाटोप सुरू आहे. नेहमी सत्तेत राहिलेल्या या नेत्यांना सत्तेशिवाय राहण्याची सवय नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीत मोठी फुटाफुट होणार आहे, असा दावा त्यांनी केला.
विरोधक सरकार पडणार असे, वारंवार सांगत आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे हे शिंदे-फडणवीस सरकारबद्दल काही ठिकाणी बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचा हा खटाटोप सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
सत्तेशिवाय करमेना
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी सत्तेत राहिलेला पक्ष आहे. त्यांचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार असून, त्यांचे खासदार, आमदार, नेते भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करतील. आता आमच्याकडे १६४ चे बहुमत आहे. ते लवकरच १८५ वर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community