भाजपासाठी (BJP) आगामी २०२४ची लोकसभा निवडणूक प्रथम प्राधान्य बनले आहे. या निवडणुकीत ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा मानस पक्षाचा आहे. त्याची देशपातळीवर रणनीती ठरवण्यात येत आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप (BJP) कामाला लागला आहे. उत्तर प्रदेशनंतर अधिक जागा जिंकता येतील, असे महाराष्ट्र राज्य असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे.
दररोज ३ सभा घेणार
महाराष्ट्रातून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा मानस भाजपने (BJP) केला आहे. त्यामुळे फडणवीस आता राज्य पिंजून काढणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभेच्या यशावरच भाजपचे (BJP) महाराष्ट्रातील विधानसभेचे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे प्रचाराचा धडाका उडवून देणार आहे. त्यासाठी फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज ३ सभा घेणार असल्याचे समजते. त्यांच्या सभांचे वेळापत्रक अजून तरी जाहीर झाले नाही, मात्र ते लवकरच जाहीर होणार आहे. या सभा महायुतीतील आमदार आणि खासदार यांच्यासोबत घेतल्या जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community