-
प्रतिनिधी
दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष भाजपाला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) नेतृत्वावर दिल्लीकरांनी केलेले शिक्कामोर्तब असून, केंद्रीय गृहमंत्री व पक्षाचे प्रमुख नेते अमित शाह यांच्या कष्ट व व्यवस्थापनाचे फळ असल्याचे कौतुकोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शनिवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काढले.
(हेही वाचा – दिल्लीतील भाजपाच्या दणदणीत विजयावर CM Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया; म्हणाले; दिशाभूल करणाऱ्या…)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपाला मिळालेल्या ४० हून अधिक जागा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाच्या प्रतिक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल, असा दावा करतानाच, आता चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचे, देशाच्या राजधानीचे सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचे स्वप्न पूर्ण होईल असा ठाम विश्वासही उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. त्याचवेळी दिल्ली विधानसभेतील निर्णायक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत दिल्लीत स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
(हेही वाचा – अरविंद केजरीवालांच्या नौटंकीची दिल्लीच्या जनतेकडून चिरफाड; Pravin Darekar यांचा प्रहार)
दिल्लीतील भाजपाच्या यशामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कष्ट व निवडणूक व्यवस्थापनाचेही मोठे योगदान आहे. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनतही महत्त्वाची ठरली. आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांच्यासारख्या नेत्यांना पराभूत करून दिल्लीकरांनी भाजपा आणि ‘एनडीए’च्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचेही उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी या निवडणुकीतून आम्हाला खुप शिकायला मिळाले आहे. मात्र ही खरी सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचे विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल, आणि दिल्लीसह इतर देशातल्या अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असा निर्धारही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community