Assembly Election : भाजपाची टॅग लाईन ‘बटेंगे तो कटेंगे’ ठिकठिकाणी लागले बॅनर्स

92
Assembly Election : भाजपाची टॅग लाईन 'बटेंगे तो कटेंगे'' ठिकठिकाणी लागले बॅनर्स
Assembly Election : भाजपाची टॅग लाईन 'बटेंगे तो कटेंगे'' ठिकठिकाणी लागले बॅनर्स

राज्याच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना राजकीय बॅनरबाजीला ही सुरुवात झाली आहे. दरम्यान मुंबईतील अनेक भागात योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे छायाचित्र असणारे ‘बटेंगे तो कटेंगे’ असे लिहलेले पोस्टर लागले आहेत. हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी हे घोषवाक्य वापरले होते. त्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ही हे घोषवाक्य चर्चेत आहे.

( हेही वाचा : झारखंडमधील जागावाटपावरुन I.N.D.I. Alliance मध्ये फूट; राजद स्वतंत्रपणे लढण्याच्या पवित्र्यात

भाजप समर्थक विश्वबंधू राय यांनी हे पोस्टर मुंबईतील अनेक भागात लावलेले असून योगींबद्दल (Yogi Adityanath) उत्तर भारतीयांच्या मनात आदर असल्याचे ही ते म्हणाले. त्यामुळे विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून ‘बटेंगे तो कटेंगे’ चे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये लिहलेय की, ‘बंटेंगे तो कटेंगे… योगी (Yogi Adityanath) संदेश- एक रहेंगे तो नेक रहेंगे, सुरक्षित रहेंगे’ असे पोस्टरवर लिहण्यात आले आहे. (Assembly Election)

दरम्यान भाजपने ९९ विधानसभा मतदारसंघासाठी (Assembly Election) उमेदवार जाहिर केले असून इतर कोणत्याही पक्षाकडून उमेदवार जाहिर करण्यात आले नाहीत. महाराष्ट्रात दि. २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (Assembly Election)

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.