मविआच्या दोन मतांवर भाजपचा आक्षेप, निवडणूक आयोगाचे म्हणणे काय?

162

चुरशीच्या अशा राज्यसभा मतदानाला सुरुवात झाली आहे. पण या मतदानादरम्यान भाजपने मविआच्या दोन मतांवर आक्षेप घेतल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

भाजपचा आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदान पद्धतीनुसार प्रत्येक मतदार आमदाराने आपल्या पक्षाच्या अधिकृत एजंटला एका ठराविक अंतरावरुन मतपत्रिका दाखवायची असते. पण जितेंद्र आव्हाड आणि आणि यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या पक्षाच्या एजंटच्या हातात मतपत्रिका घेतल्यामुळे भाजपकडून या दोघांच्या मतदानावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

मतदान ग्राह्य

भाजपने नोंदवलेल्या या आक्षेपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आपला निर्णय देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपचा हा आक्षेप फेटाळला असून, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मते ग्राह्य असल्याचं सांगितले आहे, अशी माहिती सध्या मिळत आहे.

भाजपच्या या आक्षेपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे आमदार हे सध्या बावचळलेले असून, त्यांच्या आक्षेप घेण्याने काहीही फरक पडत नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.