दोनवेळा राज्यसभा मिळाल्यानंतर ‘या’ भाजप मंत्र्यांना लढवावी लागणार लोकसभेची निवडणूक

179
दोनवेळा राज्यसभा मिळाल्यानंतर 'या' भाजप मंत्र्यांना लढवावी लागणार लोकसभेची निवडणूक
दोनवेळा राज्यसभा मिळाल्यानंतर 'या' भाजप मंत्र्यांना लढवावी लागणार लोकसभेची निवडणूक

देशात आगामी वर्षी, २०२४ रोजी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपली रणनिती आखण्यात व्यग्र आहेत. भाजपकडून सर्वच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची चाचपणी सह चर्चा सुरू आहे. दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेल्यांना भाजप पुन्हा संसदेत जाण्याची संधी देत नाही, त्यांना त्यांच्या स्थानिक मतदारसंघातून निवडून येणे गरजेचे असते. ज्या मंत्र्यांनी यापूर्वी कधीही लोकसभा निवडणूक लढवली नाही, अशा मंत्र्यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात भाजप उतरवणार आहे. या मंत्र्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, मनसुख मांडविया, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आदींच्या नावांचा समावेश आहे.

सध्याचे परराष्ट्र मंत्री सुब्रह्यण्यम जयशंकर हे गुजरातमधून राज्यसभेचे खासदार आहेत. राज्यसभेतील त्यांचा कार्यकाळ अजून बाकी आहे. मोदी सरकारमध्ये २०१९ मध्ये ते परराष्ट्र मंत्री झाले आहेत. यावर्षीं त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयशंकर हे अमेरिका, चीन आदी देशांमध्ये राजदूत राहिले आहेत. त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले आहे. आगामी लोकसभेसाठी त्यांना दिल्लीतून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – ठाकरेंच्या अडचणी वाढणार; अलिबागमधील १९ बंगल्यांप्रकरणी अहवाल मागवला)

तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा जन्म तामिळनाडू येथील आहे. त्या अर्थशास्त्राच्या पदवीधर आहेत. त्यांनी जेएनयू येथून एमफिल केलं आहे. अर्थमंत्री होण्यापूर्वी त्या देशाच्या सरंक्षणमंत्री होत्या. त्या कर्नाटकमधून राज्यसभेच्या खासदार आहेत. २००३ मध्ये त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य होत्या. त्याचप्रमाणे गुजरातमधील मनसुख मांडविया हे सध्या आरोग्यमंत्री आहेत. गुजरातमधील सर्वात तरुण विधानसभा आमदार म्हणून त्यांचा रेकॉर्ड आहे. २०१८ मध्ये दुसऱ्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून ते निवडून आले आहेत.

केंद्रातील आणखी एक मोठे नाव म्हणजे पीयूष गोयल. पीयुष गोयल हे मोदी सरकारमध्ये उद्योगमंत्री आहेत. कोरोना काळात ते रेल्वेमंत्री होते. २०१० मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले. २०१६ मध्ये दुसऱ्यांदा ते राज्यसभेचे खासदार झाले. याच क्रमात मंत्री तथाआयटी तज्ज्ञ अश्विनी वैष्णव रेल्वेमंत्री आहेत. त्यांचा जन्म जोधपूर (राजस्थान) येथील आहे. २०१९ मध्ये ते ओडिशामधून राज्यसभेवर खासदार झाले आहेत. या सर्व मंत्र्यांना आता राज्यसभेएवजी लोकसभेतून मार्गक्रमण करावे अशाप्रकारची व्ह्यूव रचना सध्या भाजपामध्ये रचली जात आहे. यामुळे जनतेतून निवडून येणाऱ्या लोकसभेतील खासदारांची नाराजगी देखील दूर होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.