- सुजित महामुलकर
भाजपने (BJP) लोकसभा निवडणुकीची तयारी केली सुरू असून पुढील महिनाभरात राज्यातून ५० हजाराहून अधिक लोकांना अयोध्यावारी (Ayodhya) आणि रामललाचे दर्शन घडविण्याची तयारी केली आहे. मात्र ही सेवा मोफत असणार का? असा प्रश्न केला जात आहे.
१५ लाखांतून केवळ १,३५० भाग्यवान
एक लोकसभा (Lok Sabha) मतदार संघात सरासरी १५ लाख मतदार संख्या असते आणि एका लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा (assembly constituency) (सरासरी २ लाख मतदार) मतदार संघ असतात. मात्र पहिल्या टप्प्यात या १५ लाखांतून केवळ १,३५० लोकांना भाजपच्या ‘रामलला दर्शन’ सेवेचा लाभ घेता येऊ शकेल. सोमवारी, ५ फेब्रुवारीला पहिली रेल्वे (railway) उत्तर मुंबई (Mumbai north) मतदार संघातून निघाली असून शेवटची रेल्वे ६ मार्चला रवाना होईल.
(हेही वाचा कुत्र्याने न खाल्लेले बिस्कीट दिले कार्यकर्त्याला; Rahul Gandhi झाले ट्रोल)
१,६०० रुपये मोजावे लागणार
हा राजकीय पक्षाचा उपक्रम (political party initiative) असला तरी मोफत नसून या जवळपास पाच-सहा दिवसाच्या दौऱ्यासाठी इच्छुकाला प्रती माणशी १,६०० रुपये मोजावे लागणार आहेत. यात रेल्वे तिकीट (जाणे-येणे), रेल्वे प्रवासात चहा, नाश्ता, जेवण तसेच अयोध्येत राहणे, खाणे, आणि राम दर्शन याचा समावेश आहे. तसेच रामलला (Ramlala) दर्शन झाल्यावर हनुमानगढी (Hanuman gadhi)आणि शरयू आरती पाहता येणार आहे, अशी माहिती उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय पांडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला (Hindusthan Post) दिली.
३८ विशेष रेल्वे गाड्या तयार
साधारण ३०-३२ तासांचा हा एकतर्फी (वन-वे) प्रवास असून जवळपास दीड दिवस जायला आणि दीड दिवस परतीच्या प्रवासाला लागणार. त्यामुळे एकूण पाच ते सहा दिवसांचा हा उपक्रम आहे. सध्या ३८ विशेष रेल्वे गाड्यांची (नॉन-एसी) (special train non-AC) व्यवस्था झाली असून प्रत्येक लोकसभा मतदार संघातून एक रेल्वे अयोध्येला जाईल. एका रेल्वेची क्षमता १३५० असून सोबत आणखी १०० प्रवासी ज्यात कार्यकर्ते, सुरक्षा कर्मचारी, कॅंटीन स्टाफ अशांचा समावेश असेल, असे पांडे म्हणाले.
Join Our WhatsApp Community