BJP कार्यकारी अध्यक्ष निवडणार; तावडे यांचे नाव पुन्हा चर्चेत

शनिवारी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक

149
Assembly Election : आमदार रांजळे यांचे अवघडच ? भाजपामधून बंड, मुंडे ही विरोधात गेले...
  • वंदना बर्वे

भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवडला जाणार असल्याची माहिती आहे. अशात, नवीन अध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत कार्यकारी अध्यक्ष निवडण्याच्या मुद्यावर शनिवार (१७ ऑगस्ट) रोजी होणाऱ्या भाजपाच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

महाराष्ट्रासह तीन राज्यात होणाऱ्या विधासभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशात, भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणे अवघड आहे. शिवाय, अध्यक्षची निवड करण्याची भाजपाची आपली प्रक्रिया आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत पूर्णवेळ अध्यक्षाची निवड होईपर्यंत कार्याध्यक्ष नेमण्याचा पक्ष गांभीर्याने विचार करीत आहे. या शर्यतीत अनेक नावे आहेत. मात्र यात विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून येते.

(हेही वाचा – Independence Day: तुम्हाला माहित आहे का, पहिली परेड कधी घेण्यात आली होती?)

याचे कारण असे की, महाराष्ट्रात निवडणूक होणे आहे. राज्यातील ओबीसी मतदारावर भाजपाचा डोळा आहे. तावडे यांना कार्याध्यक्ष बनविले तर ओबीसी मतदार भाजपाकडे ओढला जाईल, असे रणनीतीकारांना वाटते आहे. येत्या शनिवारी भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेल्या सदस्यत्व मोहिमेसह अन्य संघटनात्मक निवडणुकांची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्यापूर्वी कार्यवाह अध्यक्षाचे नाव जाहीर करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

यापूर्वी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीसाठी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत सदस्यत्व मोहीम आणि १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत सक्रिय सदस्यत्व मोहीम राबविण्याची चर्चा होती. मात्र, मध्यंतरी संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. सदस्यत्व मोहीम पुर्ण होणे आवश्यक आहे. किमान ५० टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका होणे आवश्यक आहेत. अशा बैठकीत अध्यक्ष निवडीपूर्वी सर्व प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची रूपरेषा तयार केली जाणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारीही उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा – Pune Crime : सरकारी रुग्णालयात बांगलादेशी घुसखोर आढळून आल्याने हादरले पुणे)

संघाशीही चर्चा झाली…

गेल्या रविवारी भाजपाच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांनी संघाचे दत्तात्रेय होसाबळे आणि इतर काही वरिष्ठ नेत्यांशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष उपस्थित होते.

ओबीसीवर डाव खेळण्याची तयारी

पूर्णवेळ अध्यक्ष निवडीसाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शिवाय हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत पूर्णवेळ अध्यक्षाची निवड होईपर्यंत कार्याध्यक्ष नेमण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाकडून घेतला जाऊ शकतो. या शर्यतीत अनेक नावे आहेत. मात्र, सध्या तावडेंचा वरचष्मा असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. तावडे हे महाराष्ट्रातील निवडणुकीतील ओबीसी समाजाचे नेते आहेत. अशा स्थितीत त्यांना कार्याध्यक्ष बनवून निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील ओबीसी मतदारांना सकारात्मक संदेश देण्याची तयारी पक्षाने चालवली आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.