- प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचा (BJP) नवीन अध्यक्ष पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये निवडला जाणार आहे. यामुळे संघटनेची निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी पक्षाने निरिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत.
(हेही वाचा – MVA च्या केवळ एका महिलेला जनतेने स्वीकारले; २७ महिलांना नाकारले!)
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारी पक्षाच्या निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. महासचिव विनोद तावडे यांना बिहार आणि उत्तर प्रदेशचे निरिक्षक बनविण्यात आले आहे. अरुण सिंग यांच्याकडे महाराष्ट्र, गोवा, दमण, दादरा नगर हवेलीची जबाबदारी देण्यात आली आहे. सरचिटणीस सुनील बन्सल यांच्यावर पश्चिम बंगाल, हरियाणा, आसाम आणि आणि झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. तरूण चुघ केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि लक्षद्वीपचे निरीक्षक असतील. शिवप्रकाश यांच्याकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. राधामोहन दास राजस्थान, पंजाब, चंदीगड आणि गुजरातचे निरीक्षक असतील. श्रीकांत शर्मा यांना उत्तराखंडचे निरिक्षक बनविण्यात आले आहे. (BJP)
भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक डिसेंबरमध्ये होणे आहे. तत्पूर्वी जिल्ह्यापासून राज्य पातळीपर्यंतच्या सर्व निवडणुका संपन्न व्हायला हव्या. यासाठी निरिक्षक नेमण्यात आले आहेत. भाजपाची अंतर्गत रचना मजबूत आणि पारदर्शक रहावी यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने संपन्न करणे निरिक्षकांची मुख्य जबाबदारी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community