राज्यात शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष आणि विशेषतः ठाकरे गटाकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. असे असतानाच आता भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रावसाहेब दानवे यांचे विधान
शिवसेना-भाजपची 25 वर्ष जुनी तुटली, गेले अडीच वर्ष राज्यात असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळेल असं कोणालाही वाटत नव्हतं पण तरी ते कोसळलं. पण तरीही एका रात्रीत अशी काय जादू झाली की महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे आता असंच राजकारण राज्यात चालत राहिलं तर आणखी दोन महिन्यांनी काय होणार?,याचा अंदाज कोणी लावू शकतं का?,असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
(हेही वाचाः ‘राज ठाकरे या दिवशी सगळ्यांचा हिशोब करणार’, मनसे नेत्याने स्पष्टच सांगितले)
संजय राऊतांची प्रतिक्रिया
रावसाहेब दानवे यांच्या या विधानावरुन आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत भाष्य केले आहे. रावसाहेब दानवे हे आमचे चांगली मित्र आहेत. त्यांची स्लिप ऑफ टंग झाली असून त्यात ते खरं बोलले आहेत. दोन महिन्यांनी वेगळं चित्र असेल असं ते म्हणाले म्हणजे मध्यावधीची घोषणा होऊ शकते किंवा सरकार कोसळू शकतं, याचे स्पष्ट संकेत रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. तसेच हे सरकार 100 टक्के पडू शकतं याची मला पूर्ण माहिती आहे आणि तशी खात्री देखील आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community