BJP vs Congress : जॉर्ज सोरोसशी काँग्रेसचे मजबूत संबंध; भाजपाचा आरोप

69
BJP vs Congress : जॉर्ज सोरोसशी काँग्रेसचे मजबूत संबंध; भाजपाचा आरोप
  • प्रतिनिधी 

सध्या राजधानीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जॉर्ज सोरोस प्रकरणावरून भाजपाने काँग्रेस पक्षाला चांगलेच धारेवर धरले आहे. देशाचा विकास रोखणे हा काँग्रेसचा उद्देश असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाने आरोप करताना सोनिया गांधी, तसेच काँग्रेसचे जॉर्ज सोरोसशी मजबूत संबंध असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याशी काँग्रेस पक्षाच्या संबंधांबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भाजपाने टिप्पणी केली आहे. (BJP vs Congress)

(हेही वाचा – लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार ? Aditi Tatkare म्हणाल्या …)

सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. एकामागून एक पोस्ट करत भाजपाने सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षावर प्रश्न उपस्थित केले. एफडीएल-एपी फाऊंडेशनच्या सह-अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी जॉर्ज सोरोस फाऊंडेशनद्वारे अर्थसहाय्यित संस्थेशी संबंधित असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याशी काँग्रेसच्या संबंधांवरून भाजपाकडून सोशल मीडियावर एकामागून एक पोस्ट करण्यात आल्या. सोशल मीडिया साइट X वर एकामागून एक पोस्ट करत भाजपाने सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षावर प्रश्न उपस्थित केले आहेत. (BJP vs Congress)

(हेही वाचा – विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांची भूमिका समन्यायी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन)

भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, विशेष FDL-AP फाउंडेशनने काश्मीरला एक वेगळे अस्तित्व म्हणून मानले पाहिजे असे आपले मत व्यक्त केले आहे. सोनिया गांधी आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून काश्मीरच्या कल्पनेला पाठिंबा देणारी संघटना यांच्यातील हा संबंध भारताच्या अंतर्गत बाबींवर विदेशी संस्थांचा प्रभाव आणि अशा संबंधांच्या राजकीय परिणामांवर प्रकाश टाकतो. एका वेगळ्या भाजपा पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी फाऊंडेशनने जॉर्ज सोरोस फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे, जे भारतीय संस्थांवर विदेशी निधीचा प्रभाव स्पष्टपणे दर्शवते. एका वेगळ्या पोस्टमध्ये भाजपाने खासदार राहुल गांधी यांचा फोटो शेअर केला आहे. या चित्रासोबत लिहिलं होतं की, सोरोसने आर्थिक मदत केलेल्या ओपन सोसायटी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सलील शेट्टी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत दिसले होते. (BJP vs Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.