BJP vs Shiv sena :कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजप समर्थक भिडले; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

159
BJP vs Shiv sena :कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजप समर्थक भिडले; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

कल्याणमधील शिवसेना आणि भाजप (BJP vs Shiv sena) समर्थकांमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. नुकताच भाजप आणि शिवसेना पक्षाचे समर्थक यांच्यात राडा झाला. कल्याण पूर्व येथे भाजप पक्षाचे चिन्ह भिंतीवर रेखाटत असलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या समर्थकांनी विरोध करत बेदम मारहाण केली.

शिवसेनेच्या (BJP vs Shiv sena) माजी नगरसेवकांच्या समर्थकांनी ही मारहाण केली असल्याचा आरोप भाजप समर्थकांनी केला आहे. यामुळे कल्याण पूर्व विभागात आजही शिंदे आणि भाजप यांच्यात वाद (BJP vs Shiv sena) असल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.

(हेही वाचा – Indian Railways : रेल्वेच्या 32 हजार कोटींच्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी)

आपल्या माजी नगरसेवकांना (BJP vs Shiv sena) आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा मोरे यांनी दिला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविणार असल्याचे देखील मोरे यांनी सांगितले.

नेमका प्रकार काय?

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील टेकडी परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजप पक्षाच्या चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान शिंदे गटाचे माजी नगरसेवकाचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध करत तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम (BJP vs Shiv sena) मारहाण केली. शिवसेना नगरसेवक यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.