म्हणून भाजपच्या मनात ‘मन’से!

मी हिंदुत्वाची जी लाईन पकडली होती ती अधिक तेज करेन, तसेच परप्रांतियांच्याबाबत माझ्या मनात घृणा आणि द्वेष नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे पाटील म्हणाले.

125

भाजप मनसे हे भविष्यात एकत्र येतील अशी चर्चा आता जोर धरू लागली असून, खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंजवर जात थेट या मनोमिलनाचे संकेत दिले आहे. जरी अजूनही दोन्ही पक्षाकडून युतीबाबत स्पष्टता होत नसली तरी पुणे-नाशिक महानगर पालिकेत भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्याच ताब्यात ठेवायची आहे. त्याचमुळे भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची ही धडपड असून, राज ठाकरे यांच्या मनसेसोबत हात मिळवणी करण्याचा इरादा या दोन्ही नेत्यांचा आहे. जरी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढले नाही तरी देखील एकमेकांना अप्रत्यक्षपणे साथ नक्की देतील, अशी माहिती भाजप आणि मनसेच्या गोटातून मिळत आहे.

भाजपचे लक्ष्य पुणे-नाशिक मनपा

चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्या त्यांचे लक्ष हे मुंबई महानगर पालिकेप्रमाणेच पुणे आणि नाशिक महानगर पालिका निवडणुकीकडे केंद्रित केले आहे. पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित दादा हे पुणे महानगर पालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याच्या दिशेने हालचाली करत आहे. अजित दादा यांचे लक्ष सध्या पुणे महानगर पालिका असून, भाजपला आपली सत्ता गमवायची नाही. चंद्रकांत पाटील हे पुण्याचे आमदार असल्याने त्यांच्यासाठी पुणे महानगर पालिकेत सत्ता कायम ठेवणे प्रतिष्ठेचे बनले आहे. त्याचमुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी बसलेल्या दादांना पुण्यात फाईट देण्यासाठी नव्या भिडूची गरज लागणार आहे. याचमुळे मनसेच्या साथीने पुणे महापालिकेत भाजपचा झेंडा सहज फडकवता येईल असा भाजपला विश्वास आहे. तर नाशिकमध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. तसेच नाशिकमध्ये मनसेची देखील ताकद आहे. याचमुळे मनसेच्या साथीने नाशिक पालिकेत भाजपला आपला झेंडा पुन्हा फडकवायचा आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीत या दोन महानगर पालिकेबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा : सरकार चालवताय कि दाऊदची गँग? आशिष शेलारांचा घणाघात)


मुंबईतही आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करत आहोत. व्यक्तीगत पातळीवर सर्वच पक्षाची कामं सुरू आहेत. पण दोन पक्ष भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असतील तर त्याचा आनंदच असेल.
– बाळा नांदगावकर, मनसे नेते

हा मुद्दा दोघांना एकत्र आणणार?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हे मोठे विधान केले आहे. राज ठाकरे यांच्याशी भेट झाल्यावर परप्रांतियांचा मुद्दा आणि हिंदुत्व या दोन विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली. यावेळी राज यांनी कोविडच्या दीड वर्षात माझी भूमिका मी जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही. आता कोविड कमी झाला. मी हिंदुत्वाची जी लाईन पकडली होती ती अधिक तेज करेल, पण मी हिंदुत्वाची जी लाईन पकडली होती ती अधिक तेज करेल, पण अन्य प्रांतियांच्याबाबत माझ्या मनात घृणा आणि द्वेष नाही, असे राज यांनी सांगितल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. परप्रांतियांच्याबाबत माझ्या मनात घृणा आणि द्वेष नाही, असे राज यांनी सांगितल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भविष्यात हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

राणे-राज यांची दोस्ती

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यातच आता राणेंना राज्यात भाजप मजबूत व्हावे यासाठी मंत्रिपद दिले आहे. भविष्यात नारायण राणे देखील आपल्या या मित्राला युतीसाठी साद घालू शकतात, असे बोलले जात आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याची सल भाजपच्या मनात आहे. त्याचमुळे शिवसेनेला देखील भाजपला अद्दल घडवायची असल्याचे भाजपचे काही नेते खासगीत सांगतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.