राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा भाजपला हव्यात; अमित शहांनी दिले टार्गेट

125

महाराष्ट्रात आम्हाला बहुमत नको, तर लोकसभेच्या सर्व ४८ जागा मोदींना द्या, कुटील बुद्धीने तुम्ही राजकारण करू शकता, पण मैदानात साहस आणि शौर्याची आवश्यकता लागते जी भाजपाकडे आहे. शिवसेना – भाजप युती पुन्हा महाराष्ट्रात वर्चस्व प्रस्तापित करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्देशून भाषणात टार्गेट दिले.

२०१९ मध्ये निवडणुकीत बॅनर लावले होते, त्यावर मोदींचा फोटो मोठा होता, देवेंद्र फडणवीसांचा फोटो मोठा होता, उद्धव ठाकरे यांचा छोटा फोटो होता, निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली होती, मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव मोदींनी आणि मीदेखील अनेकदा जाहीर केले, तेव्हा काही बोलले नाही, पण जसा निकाल लागला आणि मोठा पक्ष आमचा होता, पण त्यांना सत्तेचा लोभ चढला आणि ते शरद पवारांच्या चरणी गेली. आज परिस्थितीत बदलली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपसोबत आली आहे.

(हेही वाचा कोल्हापूरच्या आखाड्यातून भाजपने लोकसभेसाठी दंड थोपटले; भाजप-शिवसेना एकत्र लढणार)

पराभव दूरदूर पर्यंत दिसत नाही

आजच्या शुभ दिवस आजच्या दिवशी शिवरायांनी भारतमातेला गुलामीच्या साखळदंडामधून मुक्त करण्याचे मोठे काम केले. पुण्यात आम्ही शिवसृष्टीच्या प्रथम टप्प्याचे लोकार्पण केले. आताच आपण कोल्हापुरात श्री आंबा मातेचा आशीर्वाद घेतला. आपल्या सर्वांच्या जीवनात देवीचा आशीर्वाद महत्वाचा आहे, मी जेव्हा जेव्हा देवीचा आशीर्वाद घेतला आहे भाजपाला मोठे यश मिळाले आहे, आजही २०२४ च्या विजयाचा संकल्प घेऊन इथे आलो आहे. आम्ही राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहोत आणि समोर सगळे जण एक बास्केटमध्ये येऊन लढणार आहेत. ही निवडणूक पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी नाही, तर महान भारत, समृद्ध भारत बनवण्याच्या संकल्पासाठीची निवडणूक आहे. म्हणून विरोधक सगळे एकत्र येणार आहेत, पण मी यत्किंचितही भयभीत नाही, कारण  भाजपाकडे दैवदुर्लभ कार्यकर्ते आणि पंतप्रधान मोदी यांच्यासारखे महान नेतृत्व  आहे, त्यामुळे पराभव दूरदूर पर्यंत दिसत नाही, असेही अमित शहा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.