मुंबईत काँग्रेसची न्याय यात्रा निघाली की, मुंबईकरांच्यावतीने आम्ही त्यांना “खटाखट ५१ सवाल” विचारणार आहोत, अशी माहिती मुंबई भाजपा (BJP) अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली. मुंबई भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी (१३ ऑगस्ट) दादर वसंत स्मृती कार्यालयात पार पडली. आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल, मंत्री मंगल प्रभात लोढा, महामंत्री संजय उपाध्याय, आमदार मनिषा चौधरी, योगेश सागर, सुनिल राणे, मिहिर कोटेचा, माजी खासदार गोपाळ शेट्टी आदी कमिटी सदस्य उपस्थित होते.
(हेही वाचा – बांगलादेशात इस्लामी राजवट आणा; Al Qaeda चे आवाहन)
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, मुंबईकरांवर आजपर्यंत अन्याय करणाऱ्या काँग्रेसला यात्रा काढण्याचा नैतिक अधिकार काय? दुसरी बाब म्हणजे यात्रा काढण्याची मोनोपॉली तर आमची असून काँग्रेस आता आमच्या मार्गावर चालते आहे. काँग्रेस जर न्याय यात्रा काढीत असेल तर, त्यांनी मुंबईकरांवर केलेल्या अन्यायाची जंत्री आम्ही मुंबईकरांच्यावतीने काँग्रेससमोर मांडू. मुंबईकरांवर जेवढा अन्याय काँग्रेसने केला तेवढा दुसरा कोणी केला नाही. आता त्या स्पर्धेत उबाठा उतरली आहे. (BJP)
(हेही वाचा – Shivraj Singh Chauhan भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?)
काँग्रेसची न्याय यात्रा समोरून जाताना मुंबईकर त्यांना विचारणार आहेत की, खटाखट खटाखट महिन्याला १ लाख रुपये येणार होते त्याचे काय झाले? खोटं बोलून मत घेतलीत संसदेचे अधिवेशन झाले तेव्हा संविधान विषयात तोंडातून ब्र काढला नाही? याबाबत मुंबईकर काँग्रेसला विचारणार आहे कारण खोटे का बोललात? तसेच मुंबईला हिरव्या पिल्लावळीच्या घशात घालण्याचा डाव घातला जात आहे याबबातही मुंबईकर विचारणार आहेत तसेच धारावीतील अरविंद नावाच्या हिंदू कार्यकर्त्याची हत्या झाली. त्याच्या घरी खासदार वर्षा गायकवाड का गेल्या नाहीत? आमच्या मराठी असलेल्या आणि मुळ मुंबईकर असलेल्या फेरिवाल्यांवर अन्याय होतोय बाहेरून हिरवी पिल्लावळ वाढतेय… असे ५१ प्रश्न मुंबईकर काँग्रेसला विचारणार आहेत, असे आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community