पंजाबमध्ये भाजप 65 जागा लढवणार! नड्डा यांनी केली घोषणा

146

पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांपैकी भाजप 65 जागा लढवणार आहे. सोमवारी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जागा वाटपाची घोषणा केली. यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सुखदेव ढिंडसाही उपस्थित होते.

जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की

पंजाबमध्ये भाजप कॅप्टन अमरिंदर आणि ढींढसा यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की झाला. या फॉर्म्युल्यानुसार भाजपा पंजाबमध्ये 65, कॅप्टन अमरिंदर सिंह यांची पंजाब लोक काँग्रेस 37 आणि सुखदेव ढिंडसा यांची पार्टी 15 जागांवर निवडणुका लढवणार आहे. या तीन पक्षांच्या आघाडीने 117 पैकी 71 जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पंजाबमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पंजाब सीमेवरील राज्य असल्याने देशाच्या सुरक्षेशी जोडला गेलेला प्रदेश आहे.

(हेही वाचा – सावधान! ‘या’ महाविद्यालयाचा परिसर बनतोय दारूचा अड्डा!)

ड्रग्स, रेती आणि लँड माफियांचा खात्मा करू

पाकिस्तानातून ड्रग्स, शस्त्रांचे स्मगलिंग केले जातेय. आम्ही पंजाबमधून ड्रग्स, रेती आणि लँड माफियांचा खात्मा करू असे यावेळी जे. पी. नड्डा यांनी सांगितले. यावेळी नड्डा म्हणाले की, पंजाबवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जो पंजाब एकेकाळी विकासात अग्रेसर होता तो आता माग पडत आहे. पंजाबला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची जबाबदारी आमची आहे. केंद्र आणि राज्यातील संबंध तसेच सुरक्षा यासाठी हे आवश्यक आहे. पंजामध्ये आगामी 20 फेब्रुवारी रोजी मतदान असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.