BJP : मित्रपक्षाचे उमेदवारही भाजप ठरविणार

आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजप खूप सावधगिरीची पावले टाकत आहे

219
BJP ची राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू, निवड समिती स्थापन
  • वंदना बर्वे

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष केवळ स्वतःचेच नव्हे तर मित्र पक्षांच्या उमेदवारांचाही निर्णय करणार आहे. भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला कोणत्याही प्रकारची चूक होऊ द्यायची नाही आहे. यामुळे भाजप केवळ स्वतःच्या उमेदवारांवर अंतिम निर्णय घेणार नाही आहे तर मित्र पक्षांना ज्या जागा सोडल्या जातील तेथील त्यांच्या उमेदवारांचाही अंतिम निर्णय भाजपकडून घेतला जाणार आहे.

सध्या लोकजनशक्ती पक्षाच्या दोन्ही गटात हाजीपूर जागेवरून वाद निर्माण झाला आहे. चिराग पासवान स्वतःच्या आईला हाजीपूरमधून उतरविण्यासाठी उत्सुक आहेत तर केंद्रीय मंत्री पशुपति पारस यांनी हाजीपूर सीटवार दावा केला आहे. याच जागेवरून दोन्ही गटात तू तू मैं मैं सुरु आहे. मात्र, भाजप आणि रालोआ ज्या जागा लढविणार आहे त्या जागेवर सशक्त उमेदवारच उतरवीला जावा अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. यामुळे मित्र पक्षांच्या उमेदवाराचा निर्णयही भाजपकडून घेतला जाणार आहे. याबाबत मित्र पक्षांना कळविण्यात आले आहे. हाजीपूरच्या मुद्यावर दोन्ही गटाने आपला होकार दर्शवीला आहे.

हाच फॉर्मुला बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह, जितन राम मांझी, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांवरही लागू होणे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजप खूप सावधगिरीची पावले टाकत आहे. एनडीएमध्ये एकजूट कायम ठेवण्यासाठी आणि सर्व जागांवर मजबूत उमेदवार उभे करण्यासाठी, पक्षाने विशिष्ट जागेवर मित्रपक्षांमध्ये संघर्ष टाळण्यासाठी ठोस रणनीती ठरवली आहे. मित्रपक्षांनी त्यांच्या वाट्याला असलेल्या जागांवर तगडे उमेदवार उभे करावेत अशी पक्षाची इच्छा आहे. त्यासाठी मित्रपक्षांच्या वाट्याला येणाऱ्या जागांशी संबंधित उमेदवारांचीही माहिती पक्ष घेणार आहे.

(हेही वाचा – Goa : गोव्याचे मणिपूर घडवण्याचे षडयंत्र; फादर बोल्मेक्स यांच्याकडून शिवरायांचा अवमान, आता पुतळाही फोडला)

निवडणुकीच्या रणनीतीशी संबंधित पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, पक्ष विविध स्तरांवर देशातील सर्व ५४३ जागांची माहिती घेत आहे. उमेदवार निवडीत पक्ष मित्रपक्षांना सहकार्य करेल, असे या नेत्याने सांगितले. त्यांच्या जागेवर कोणत्या पार्श्वभूमीचा उमेदवार असावा हे त्यांना सांगेल. मित्रपक्षांमध्ये संघर्ष असलेल्या जागांवर अंतिम निर्णय भाजप नेतृत्व घेईल. रालोआमध्ये सध्या जवळपास ३९ पक्ष आहेत. आगामी निवडणुकीत यातील जवळपास १० मित्र पक्ष रिंगणात उतरणार आहेत. उर्वरित पक्ष निवडणूक लढणार नाहीत.

त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेत सामावून घेतले जाणार आहे. रालोआच्या मताचे विभाजन होऊ नये ही यामागची भूमिका असल्याचे समजते. महाराष्ट्र आणि बिहारमधील जागांची वाद सोडवणे अवघड आहे. या राज्यांमध्ये अशा अनेक जागा आहेत ज्यांवर दोन-दोन पक्षांनी दावा केला आहे. विशेषत: बिहारमध्ये जागावाटपावरून लोजप आणि लोजपा रामविलास अडकले आहेत, तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात डझनभर जागांवर संभ्रम आहे. अशा जागांवर वाद टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाचा निर्णय अंतिम असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.