आर्थिकदृष्ट्या दुर्बल ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी भाजपने काय केली घोषणा?

ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी, या दृष्टीने ट्रस्ट स्थापन करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ह्या माध्यमातून गरजूंना मदत दिली जाईल, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिकच्या पुणे केंद्राच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

पुरोहितांनी ई श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

यावेळी संस्थेचे केंद्र प्रमुख माणकीकर यांनी समाज सहाय्यक संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ह्या ट्रस्टसाठी कायमस्वरूपी निधी संकलन करून त्यातील व्याजाच्या उत्पन्नाचा समाजहितासाठी विनियोग करता येईल, असे सांगतानाच मी यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देतो, असेही चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. तसेच पुरोहितांनी ई श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी करावी, त्याचा दीर्घकालीन लाभ होईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

(हेही वाचा गोव्यातही प्रशांत किशोरच! टीएमसीमुळे काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात! काय आहे गोव्याचे भविष्य?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here