‘पोलखोल अभियाना’च्या गाडीवर हल्ला करणाऱ्याच्या अटकेच्या मागणीसाठी भाजप काढणार मोर्चा

आमदार प्रसाद लाड यांची माहिती

170

मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या मुंबई भाजपच्या ‘पोलखोल अभियान’ रथावर रात्रीच्या काळोखात चेंबूर येथे भ्याड हल्ला करण्यात आला. महाविकास आघाडीकडे उत्तर नसल्यानेचं असे हल्ले केले जात आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचे देखील भाजप नेते म्हणत आहेत.

अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी हा रथ मुंबईत फिरविण्यात येत आहे. परंतु चेंबूरमध्ये या पोलखोल अभियान गाडीची रात्रीच्या वेळी तोडफोड करण्यात आली. भाजपच्या ‘पोलखोल अभियान’ रथावर (गाडीवर) हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यास पोलिसांची मात्र दिरंगाई होतं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असताना तसेच आरोपी माहीत असताना देखील आरोपीला अटक होत नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने चेंबूर येथील अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – … म्हणून विरोधकांकडून होतोय पोलखोल रथावर भ्याड हल्ला)

आज सकाळी ११.३० वाजता कार्यकर्ते मोर्चा काढणार 

भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर तसेच माजी मंत्री आमदार आशिष शेलार जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर येथील अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर आज २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता, मुंबई भाजपचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार आहेत. याठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.