मुंबईत भाजप करणार चक्का जाम, काय आहे कारण?

113

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी ९ मार्च २०२२ रोजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘नवाब मलिक हटाव…मुंबई बचाव…’ असा एक विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

… तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही

दरेकर म्हणाले की, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे काम कोणी केले हे समोर आले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांचा माननीय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत त्यांना ७ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनामा मुख्यमंत्री यांनी घेतला नाही तर महाराष्ट्रातील जनता आता गप्प बसणार नाही. भायखळा परिसरातील वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा एक विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपा पक्षासोबतच मुंबईसह महाराष्ट्रातील जनता देखील नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून या मोर्चात सहभागी होणार आहे, असे मत प्रविण दरेकर यांनी त्यावेळी व्यक्त केले.

(हेही वाचा – पोलिसांसमोर हजर होण्यापूर्वी राणे म्हणाले, ‘…आपने शुरू किया’)

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी के. सी. कॉलेज येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिका निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, मुंबई भाजपाचे प्रभारी व आमदार अतुल भातखळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक, मुंबईतील पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष/महामंत्री, मंडळ अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, मुंबई सेल-आघाडी प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.