- प्रतिनिधी
महाराष्ट्रात भाजपाचे दीड कोटी सदस्य करू, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाच्या नवी दिल्लीतील केंद्रीय कार्यशाळेत व्यक्त केला. याच कार्यशाळेत महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी दिवसभर ही कार्यशाळा झाली. संघटनेच्या विस्तारावर देशव्यापी चर्चा झाली. देशभरातील सर्व राज्यांचे प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटन मंत्री, प्रमुख पदाधिकारी व केंद्रीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचाही सत्कार करण्यात आला.
(हेही वाचा – Koregaon Bhima Shaurya Divas 2025 साठी वाहतूक मार्गात बदल; कडेकोट पोलीस बंदोबस्त)
महाराष्ट्राची संघटनात्मक माहिती
राज्यात सुरु झालेले सदस्यता नोंदणी अभियान व त्या विषयाचे नियोजन याबाबत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सविस्तर निवेदन व सादरीकरण केले. १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान अभियान राज्यभरात राबविणार असून, पाच जानेवारीला विशेष अभियान घेण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपासून बूथ कार्यकर्त्यापर्यंत संपूर्ण संघटना बूथ वर सदस्यता नोंदणी करणार आहे. नवीन वर्षात १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश महा अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
(हेही वाचा – लहान मुलांच्या Mobile वापरावर निर्बंध आणण्याचा ‘या’ समाजाचा निर्णय; शाळांमध्ये जनजागृती करणार)
सन्मान कार्यकर्त्यांना अर्पण
सत्काराला उत्तर देताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, आजचा हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा तर आहेच आहे, पण पार्टीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा, पार्टी नेतृत्वाने दिलेल्या दायित्वाची पूर्णतः करणारा तसेच फलश्रुती असलेला आहे.आजचा सत्काराचा क्षण मी माझ्या मनात जपून ठेवत आहे. हा सन्मान मी माझ्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कष्टाचा माझ्या आजच्या यशात खूप मोठा वाटा आहे, याची मला जाणीव आहे. त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरले अशी भावना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community