आता भाजप ‘या’ मुद्यावर होणार आक्रमक

187

राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी पोलीस फडणवीस त्यांच्या बंगल्यात जाऊन फडणवीस यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्याला भाजपने राजकीय पातळीवर विरोध करण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यासाठी भाजप राज्यभर या नोटीसची होळी करणार आहे.

राज्यभर पोलीस नोटीसची होळी करणार

या प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचीही चौकशी होणार आहे. आता विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याचा विचार पोलिसांनी केला आहे. त्यावर आता पोलीस फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेणार आहे. यावरून आता भाजप आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करत नाही. तर त्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो. या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे म्हटले.

(हेही वाचा ‘मविआ’ची माघार! पोलीस फडणवीसांच्या घरात येणार)

सरकारला न्यायालयात फटका बसणार

आघाडी सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका मागोमाग एक मंत्री तुरुंगात जात आहेत. त्यांचा पापाचा घडा भरत आहे. यामुळे आघाडीचे नेते घाबरून गेले आहेत. परिणामी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना अडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडीची वाटचाल विनाशाकडे होत आहे. त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला माहिती मिळविण्याचा विशेषाधिकार असतो. त्यांना माहिती कोठून मिळाली असे विचारता येत नाही. तरीही या सरकारने बेकायदेशीर रितीने त्यांना नोटीस पाठवली. हे सरकार वारंवार कायदा धाब्यावर बसवून काम करत आहे. परिणामी त्यांना अनेकदा न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या आहेत. अनिल देशमुख, सचिन वाझे, भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन अशा अनेक प्रकरणात या सरकारला न्यायालयाचे फटके बसले आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.