पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी ‘भाजप’चं देवाला साकडं!

देशभरात होणार महामृत्युंजय मंत्राचा जप

127

भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना सभा आयोजित करणार आहे. देशाच्या विविध भागात महामृत्युंजयचा जप करण्याचा पक्षाचा विचार आहे. बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर दौऱ्यावर असताना पंतप्रधानांचा ताफा सुमारे 20 मिनिटे रस्ता जाममध्ये अडकला होता. जी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये एका जीवघेण्या संकटातून सुखरूप बचावल्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी भाजप पक्ष आणि कार्यकर्ते देवाला प्रार्थना करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह, दुष्यंत गौतम आणि बैजयंत पांडा हे कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात प्रार्थना करणार आहेत. तर तिकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुहा मंदिरात महामृत्युंजय जप केला. यासोबतच महाकालेश्वर आणि ओंकारेश्वरमध्येही पूजेचे आयोजन करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रात देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह इतर भाजप नेतेही पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये एका जीवघेण्या संकटातून सुखरूप बचावले याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्याची देवाला प्रार्थना करत आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोदींच्या दीर्घायुष्यासाठी एक ट्विट केले आहे. त्यांनी ‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् || असा मंत्र पोस्ट केला आहे. यासह त्यांचे काही फोटो शेअर करून मोदी जिओ हाजारो साल, भारत सँड विथ मोदी असे हॅशटॅश केले आहे.’ यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरूवारी मोदीच्या दीर्घायुष्यासाठी मुंबादेवीला प्रार्थना केली.

यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाड्यांचा ताफा बुधवारी पंजाबमध्ये एक फ्लायओव्हरवर अडकला तेथून पाकिस्तानची सीमा केवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे. पंतप्रधान फ्लायओव्हरवर वीस मिनिटे होते. त्यावेळी कोठूनही हल्ला होण्याचा धोका होता. पंजाबमधील काँग्रेस सरकारमुळे हे संकट ओढवले पण मोदीजी सुखरूप वाचले. त्याबद्दल देवाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि मोदींना दीर्घायुष्य मिळण्याची प्रार्थना करण्यासाठी आपण मुंबादेवीचे दर्शन घेतले. मोदी यांना दीर्घ आयुष्य मिळो, त्यांचे आरोग्य चांगले राहो आणि त्यांच्या हातून अशीच देशाची सेवा घडो यासाठी जगभरातील भारतीयांनी प्रार्थना केली. देशभरातील भारतीयांनी इष्टदेवतेचे ऋण व्यक्त केले.

पंतप्रधानांची प्रतिक्रिया

दौऱ्या संबंधित सर्व कार्यक्रम रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी भटिंडा विमानतळावर परतले. तेथे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना सांगितले, “तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार, मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत परत येऊ शकलो”.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.