उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षांवर टीका केली होती. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाला, असे दिसून आले. त्यामुळे विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने (BJP) 20 नेत्यांच्या तगड्या टीमची घोषणा केली आहे. यामध्ये दररोज सकाळी 9 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी चार जणांची टीम जाहीर करण्यात आली आहे, तर संध्याकाळी 4 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपकडून 6 जणांची टीम तैनात करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) ही घोषणा केली.
(हेही वाचा – शिवसेना आमदार Dilip Lande यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीवर टाकला बहिष्कार)
लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांच्या प्रचाराचा फटका भाजपला बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावर भाजपने सावध पावले उचलली आहेत. विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार भाजपकडून आता रोज सकाळ-संध्याकाळ विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.
सकाळी बोलणार ‘हे’ नेते
भारतीय जनता पक्षाच्या वतीने दररोज सकाळी 9 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी चार जणांची टीम जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे, मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश करण्यात आला आहे. हे चार नेते सकाळी विरोधकांना प्रत्युत्तर देतील.
संध्याकाळी असणार ६ नेत्यांची टीम
भाजपच्या (BJP) वतीने संध्याकाळी 4 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी 6 नेत्यांची टीम तैनात करण्यात आली आहे. यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, चव्हाण, अतुल भातखळकर आणि राम कदम हे सहा नेते विरोधकांना प्रत्युत्तर देतील. या व्यक्तिरीक्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचाही समावेश करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community