- प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष (BJP) देशात पक्षाचा विस्तार करण्यासाठी नवीन कार्यालय सुरु करण्याची तयारी करीत आहेत. यासाठी भाजपा देशभरात पक्षाची ७६८ कार्यालये उभारणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यातील ५६३ कार्यालये तयार झाली आहेत. तर, ९६ कार्यालयांचे काम प्रगतीपथावर आहे. अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली.
(हेही वाचा – Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता महिला-बाल सुरक्षा विधेयक सादर!)
भाजपाच्या (BJP) गोव्यातील प्रदेश मुख्यालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. केंद्रात भाजपा (BJP) सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय महत्त्वाचे सरकारी निर्णय घेतले.
(हेही वाचा – Oil Prices : इंधनाच्या किमती उतरल्यामुळे विमान प्रवासही होणार स्वस्त)
त्यांनी पक्ष संघटनेशी निगडीत असणारेही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये प्रत्येक राज्याच्या राजधानीत पक्षाचे प्रदेश मुख्यालय आणि प्रत्येक जिल्ह्यात पक्ष कार्यालयाची उभारणी याचाही समावेश आहे, असे ते म्हणाले. गोव्यात जून २०१३ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामध्ये केंद्रातील नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारला सत्तेवरून दूर करण्याचा निर्धार करण्यात आला. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community