- वंदना बर्वे
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (AAP) सरकारला सत्ताच्यूत करण्यासाठी भारतीय जनता पक्ष (BJP) संपूर्ण दिल्लीत परिवर्तन यात्रा काढणार आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच निवडणुकीच्या धुंदीत असतो हे जे म्हटलं जातं ते अगदी खरं आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणात विधानसभेची निवडणूक सुरू आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीची घोषणा कधिही होऊ शकते.
अशातही, भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मुद्यावर गंभीर चर्चा करण्यासाठी राजस्थानच्या रणथंभोर अभयारण्यात गेले होते. यात गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह दिल्लीतील तमाम बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. देशाची राजधानी दिल्लीत २०१२ पासून आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तेव्हापासून आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्यात आणि त्यात भाजपाचे पानीपत झाले. मात्र, येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा धुव्वा कसा उडवायचा? या मुद्यावर गंभीर चर्चा आहे.
(हेही वाचा – ‘Matoshree’ च्या मतदार संघावर काँग्रेसचा दावा)
दिल्लीची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक बुथला बळकट करणे आणि आम आदमी पक्षाचे अपयश लोकांना सांगणे या दोन गोष्टीवर भर देण्यात आला. ही बैठक २८ आणि २९ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली होती. यात संघटन महासचिव बी एल संतोष हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर नड्डा यांच्या निवासस्थानी सुद्धा एक बैठक पार पडली. यात प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा, संघटन महासचिव पवन राणा, विरोधी पक्ष नेते विजेंद्र गुप्ता, दक्षिण दिल्लीचे खासदार रामवीरसिग बिधुडी, माजी खासदार प्रवेश वर्मा आदी नेते उपस्थित होते. (BJP)
महत्त्वाचे म्हणजे, आम आदमी पक्षाची मनमानी, भ्रष्टाचार आणि अपयश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘परिवर्तन यात्रा’ काढली जाणार आहे. ही यात्रा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार असून याचे नेतृत्व त्या त्या क्षेत्राचे खासदार करणार आहेत. परिवर्तन यात्रेची सुरुवात नोव्हेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप, रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, वीजेचे बिल यासह अनेक मुद्यावर घेरण्याची योजना आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सुध्दा या यात्रेच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहचवली जाणार आहे. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community