कर्नाटकातील राज्यसभेच्या 4 जागांपैकी 3 जागांवर भाजप उमेदवार विजय झाले आहेत. तर काँग्रेस उमेदवाराने एक जागा पटकावली आहे. परंतु, या निवडणुकीत जेडीएसच्या पदरी निराशा आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, लहारसिंग सिरोया आणि अभिनेता जग्गेश आता कर्नाटकातून भाजपचे राज्यसभा खासदार म्हणून विजयी झाले आहेत. तर काँग्रेसच्या तिकीटावर जयराम रमेश यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मन्सूर अली खान यांना उमेदवारी दिली होती. जनता दल (सेक्यूलर) कडून राज्यसभेत पोहोचण्याच्या शर्यतीत कुपेंद्र रेड्डी सहभागी झाले होते. राज्यातून राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी सिरोया, खान आणि रेड्डी यांच्यात थेट लढत होईल असा अंदाज व्यक्त होत होता. जेडीयू (सेक्यूलर) ने गुरुवारी रात्री आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले होते. तर त्यांचे कोलारचे आमदार श्रीनिवास रेड्डी यांनी यापूर्वीच काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचे जाहीर केले होते.
( हेही वाचा: राज्यसभा निवडणुकीचा चित्तथरारक निकाल, कोल्हापूरच्या ‘या’ मल्लानं अखेर मारलं मैदान )
Join Our WhatsApp Community