आसाम नगरपालिका निवडणुकीत ‘कमळ’ फुललं, 80 पैकी 77 जागांवर विजय

117

आसाम नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. राज्यातील 80 नगरपालिकांपैकी 77 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला निवडणुकीत मोठा धक्का बसला असून त्यांना आतापर्यंत एकाही नगरपालिकेत विजय मिळवता आलेला नाही. महापालिका निवडणुकीचा निकाल अजून यायचा आहे. विशेष म्हणजे मारियाणी म्युनिसिपल बोर्डाच्या एकूण 10 जागांपैकी सात जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित तीन जागा भाजपने जिंकल्या.

भाजपने 672 वॉर्डमध्ये मारली बाजी

आसाम निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 5 महापालिका मंडळांमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपने 672 वॉर्ड जिंकले आहेत, तर कॉंग्रेसला 71 वॉर्ड मिळाले आहेत. इतर 149 प्रभागात विजयी झाले आहेत. आयोगानुसार 57 प्रभागात उमेदवार बिनविरोध निवडून आले.

(हेही वाचा – Punjab Election Result 2022: मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू)

हा विकासाभिमुख कार्यपद्धतीचा विजय

निकालांवर भाष्य करताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, भाजपच्या जनादेशात वाढ झाली असून हा विकासाभिमुख कार्यपद्धतीचा विजय आहे. एकामागून एक ट्विट करत ते म्हणाले, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या संकल्पनांचा अथक प्रचार करणाऱ्या भाजपच्या आसाम युनिटच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मी अभिनंदन करतो.” आपल्या दुसऱ्या संदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, “भाजपच्या आसाम युनिटला आणि नागरी संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या मित्रपक्षांना दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो.” काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा म्हणाले की, राजकारणातील चढ-उतार ही निरंतर प्रक्रिया असते आणि प्रत्येक पक्षाला चांगल्या-वाईट काळातून जावे लागते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आम्हाला चांगल्या वेळेसाठी कठोर परिश्रम करावे लागतील आणि संधीची संयमाने वाट पहावी लागेल. म्युनिसिपल बोर्डाच्या निकालाची जबाबदारी मी स्वीकारतो.” राज्यातील 80 पालिका मंडळांसाठी 6 मार्च रोजी प्रथमच ईव्हीएमद्वारे मतदान झाले. या निवडणुकीत सुमारे 70 टक्के मतदान झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.