भाजपाची पहिली यादी (BJP’s first candidate list) रविवार २० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीमध्ये एकूण ९९ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. तर या यादीमध्ये काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यापैकी ६ जागा एसटीसाठी आणि ४ जागा एससीसाठी आहेत. तर या यादीमध्ये भाजपाच्या तिकिटावर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणारे ११ जण आहेत. तसेच या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाने १३ महिलांना (BJP Women 13 Candidate) उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण (Srijaya Chavan) यांनाही भाजपाने उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP Women Candidate)
भाजपाने कोणत्या १३ महिलांना उमेदवारी दिली?
विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये १३ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधून प्रतिभा पाचपुते, पुण्यातील पर्वती मतदारसंघामधून माधुरी मिसाळ, जिंतूर मतदारसंघामधून मेघना बोर्डीकर, भोकर मतदारसंघामधून श्रीजया अशोक चव्हाण, फुलंब्रीमधून अनुराधाताई अतुल चव्हाण, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे, चिखलीमधून श्वेता महाले, दहिसरमधून मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. (BJP Women Candidate)
(हेही वाचा – भाजपाची पहिली यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया, म्हणाले… )
८० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी
दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष अनेकांचा पत्ता कट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, भाजपाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. (BJP Women Candidate)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community