BJP च्या कार्यकर्त्याने लग्नपत्रिकेवरच छापले ‘बटेंगे तो कटेंगे’ 

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा तहसीलमधील वांगर गावात २३ नोव्हेंबरला भाजपा कार्यकर्त्याच्या घरी हा विवाह होणार आहे. या लग्नाची खूप चर्चा सोशल मीडियावर आहे.

72

हरयाणातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा आता महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशात ज्या ९ जागांवर पोटनिवडणूक होत आहे, त्यावर भाजपाकडून (BJP) हाच नारा दिला जात आहे. दरम्यान, गुजरातमधील एका भाजपा कार्यकर्त्याने आपल्या भावाच्या लग्नाच्या लग्नपत्रिकेवर मुख्यमंत्री योगींनी दिलेला हा नारा छापला आहे. या कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा निवडणुकीआधी Ulema Board चा मविआला पाठिंबा; नाशिकमध्ये बेरोजगार मुस्लिम युवकांच्या खात्यात १२५ कोटी जमा)

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा तहसीलमधील वांगर गावात २३ नोव्हेंबरला भाजपा कार्यकर्त्याच्या घरी हा विवाह होणार आहे. या लग्नाची खूप चर्चा सोशल मीडियावर आहे. वराच्या भावाने लग्नपत्रिकेवर मुख्यमंत्री योगींनी निवडणुकीत दिलेला नारा छापला आहे, यामध्ये हिंदू समाजाला एकत्र करण्याबाबत भाष्य केले आहे. यामुळे सगळीकडे चर्चा सुरु आहे. याबाबत भाजपा (BJP) कार्यकर्त्याने सांगितले की, लोकांना जागरूक करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने लग्नपत्रिकेवर पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे चित्र तयार करण्यात आले आहे. या लग्नपत्रिकेत स्वच्छता अभियान आणि स्वदेशी अंगीकारण्यावरही भर देण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.