Karnataka मध्ये भाजपा कार्यकर्त्याने काँग्रेस आमदाराच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

50
Karnataka मध्ये भाजपा कार्यकर्त्याने काँग्रेस आमदाराच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या
Karnataka मध्ये भाजपा कार्यकर्त्याने काँग्रेस आमदाराच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

कर्नाटकातील (Karnataka) बंगळुरूमधील नागवारामध्ये भाजपाच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याच्या आत्महत्येमागे काँग्रेस (Congress) आमदार ए.एस. पोन्नन्ना (A. S. Ponnanna) आणि स्थानिक काँग्रेस नेत्या थेनिरा महेना (Thenira Mahena) यांना मृत्यूसाठी जबाबदार धरण्यास आले आहे. तरी आत्महत्या केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची ओळख ही विनय सोमय्या असून त्याचे वय ३५ वर्ष आहे.

( हेही वाचा : Ambernath मध्ये चाललंय काय? अज्ञात तरुणांनी तलवारीने फोडले माजी नगरसेवकाचे कार्यालय 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आमदार ए.एस. पोन्नन्ना (A. S. Ponnanna) यांची खिल्ली उडवल्याप्रकरणी विनय सोमय्या यांना दोन महिन्यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यामुळे आमदार ए.एस. पोन्नन्ना (A. S. Ponnanna) यांना दोषी ठरवत सोमय्या यांनी त्याच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले की, त्याच्या अटकेमुळे त्याच्या कुटुंबाला समाजात तोंड दाखवण्यास जागा नाही.त्यांच्या अटकेमुळे त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठा आणखी खालवली आहे. जामीन मिळाल्यानंतरही पोलिसांनी त्याला अनेकदा त्रास दिला आणि त्यांला नाकी नऊ आणून ठेवले होते. (Karnataka)

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत भाजपा (BJP) कार्यकर्त्याने काँग्रेस (Congress) आमदाराविरुद्ध एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे भाजपा (BJP) कार्यकर्त्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली. कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती देण्याचे काम केले,असे असताना सोमय्या यांच्यावर पोलिसांकडून छळ करण्यात आला. त्याला तो छळ सहन करावा लागला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. (Karnataka)

कर्नाटकचे (Karnataka) मंत्री डॉ. जी. परमेश्वर (Dr G Parameshwara) यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाची पोलीस कारवाई आणि चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सत्य बाहेर येईल. परमेश्वर (Dr G Parameshwara) म्हणाले की, पोलीस या प्रकरणात चौकशी करतील आणि आवश्यक ती कारवाई करतील. तपासादरम्यान, सत्य बाहेर येईल आणि निष्कर्षांच्या आधारे कारवाईचे आदेश दिले जातील. दरम्यान, अशातच पोनन्नाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, मी त्याला किंवा थेनीर महीनाला ओळखत नव्हतो. मी त्याला धमकी दिली नाही किंवा कोणावरही एफआरआय दाखल करण्यास सांगितली नाही. (Karnataka)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.