पाकिस्तान भारतात दिवस-रात्र दंगली घडविणे, दहशतवादी हल्ले करणे, भारत देश अशांत ठेवणे, यांसारखे षडयंत्र रचत असतो, पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेले आहेत. असे असतानाही पाकिस्तानचा झेंडा विश्वशांती या गोंडस नावाखाली MIT प्रशासनाकडून कोथरूडमधील कॅम्पसमध्ये लावण्यात आला होता.
प्रशासनाकडून आडेमुठेपणाची भूमिका
याबाबतची माहिती मिळताच कोथरुड भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली काही तरुण MIT च्या प्रशासनास पाकिस्तानचा झेंडा काढण्यासंदर्भात निवेदन देण्यास गेले असता MIT प्रशासनाकडून आडेमुठेपणाची भूमिका घेतली गेली, तसेच कुलगुरू यांनी संवाद साधण्याचे सौजन्यही दाखवले नाही. यामुळे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्यांनी MIT कॅम्पसमधील पाकिस्तानचा झेंडा जाळून टाकत निषेध व्यक्त केला.
(हेही वाचा शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र निवडणूक लढवणार)
Join Our WhatsApp Community