भाजपकडून काँग्रेसच्या (Congress) ५० आमदारांना ५०-५० कोटी रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री एम. सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी केला आहे. तसेच आजपर्यंत भाजप स्वबळावर राज्यात कधीही सत्तेवर आलेला नाही. ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातूनच सत्तेवर आल्याचेही ते म्हणाले.
टी. नरसीपूर विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या आरोपानंतर कर्नाटकमधील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस योजना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
(हेही वाचा – “आमच्यासाठी उद्धव ठाकरेंचा पायगुण इतका चांगला आहे की…”Nitesh Rane असं का म्हणाले?)
मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) पुढे म्हणाले की, आमदारांना खरेदी करण्यासाठी हे पैसे कुठून येतात, हे पैसे येडियुरप्पा, बोम्मई, आर. अशोक यांनी छापलेत का? हे जे पैसे आहेत, ज्याद्वारे राज्याला लुटण्यात आलं. ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि राज्यपालांचा दुरुपयोग करुन भाजप आमच्या विरुद्ध षडयंत्र करत आहे. पहिल्यांदा केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात आलं. आता मला आणि माझ्या पत्नीला लक्ष्य केलं जातंय.
भाजपची ही योजना अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी माझी प्रतिमा मलीन करून सत्तेवरून हटवण्याचे प्रयत्न सुरू केले. भाजपची ही रणनीती लोकशाहीला मारक आहे. अशा कारवाया राज्याच्या स्थैर्याला आणि विकासाला बाधा आणतो. अशा भ्रष्टाचार आणि अस्थिरता पसरवणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेऊन आपल्या सरकारला साथ द्यावी, जेणेकरून राज्यातील विकासकामे अखंडपणे सुरू राहतील, असे आवाहनही त्यांनी केले.
मी काल परवापासून मुख्यमंत्री नाही, गेल्या ४० वर्षांपासून या क्षेत्रात आहे. माझ्या विरुद्ध खोट्या केसेस केल्या जात आहेत. राज्यातील जनता मूर्ख नाही, जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मी भाजप आणि केंद्र सरकारच्या षडयंत्रापुढे झुकणार नाही. भाजपनं काँग्रेसच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी ५०-५० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आमच्या आमदारांनी ती ऑफर धुडकावली. तसेच भाजप आणि जनता दल (से.)कडून सरकारच्या योजनांचा अपप्रचार केला जात असल्याचंही ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community