BJP’s Campaign: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचा प्रचार सुरू – अतुल काळसेकर

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांचा आढावा काळसेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

196
BJP's Campaign: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचा प्रचार सुरू - अतुल काळसेकर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर (BJP’s Campaign) मंत्री नारायण राणे यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांनीच या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मतदारसंघात स्थानिक पातळीवर भाजपाचा प्रचार सुरू केला आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांचा आढावा काळसेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. उमेदवार भाजपाचा असला तरी महायुती म्हणून ही निवडणूक लढविली जाणार असल्याचेही काळसेकर आणि माजी आमदार बाळ माने यांनी स्पष्ट केले.

यावेळी माने म्हणाले, उमेदवार कोण हे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस जाहीर करतील, मात्र स्थानिक पातळीवर आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघातील १ हजार ७ बूथवर काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण मतदारसंघात भाजपाचे ५० हजार कार्यकर्ते सक्रीय असून त्याला महायुतीतील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची जोड मिळेल. जागावाटपाबाबत तिढा नाही. येथील उमेदवार कमळ चिन्हावरील असेल हे निश्चित आहे. त्यामुळे आम्ही प्रचाराचे काम सुरू केले आहे.

महायुतीतील मित्रपक्षांची संयुक्त बैठक लवकरच
प्रत्येक विभागात एका नेत्याचे नाव असते. त्यांच्या नावावरून मतदारसंघ ओळखला जातो. त्याप्रमाणे मंत्री नारायण राणे यांच्या नावाने हा मतदार संघ ओळखला जातो. त्यामुळे साहजिकच राणे हेच उमेदवार असतील, मात्र त्यांची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस करतील. महायुतीतील मित्रपक्षांची संयुक्त बैठक लवकरच होणार आहे, असे काळसेकर यांनी सांगितले.

बैठकीला लोकसभा संयोजक, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सांवत, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांच्यासह चिपळूण, संगमेश्वर, देवरूख, लांजा, राजापूर येथील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.