वंदना बर्वे
मिशन २०२४ अंतर्गत देशाची तीन प्रदेशांत विभागणी करून निवडणूक अभियान राबवण्याचे ठरले आहे. तिन्हींची थीम वेगळी असेल आणि धोरणही पूर्णपणे वेगळे राहील. यात विकासाचे युग’, दक्षिण गौरव आणि लाभार्थी मतदार’ या तीन थीम वर भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणूकीचा प्रचार केंद्रीत राहणार आहे. भाजपने २०२४ मधील लोकसभा निवडणुकीचे धोरण आखले आहे. यावरून बुधवारी दोन बैठका झाल्या. पहिली बैठक पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी साडेपाच तास चालली. यास पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाह आणि बी. एल. संतोष हजर होते. ही बैठक संपल्यानंतर अमित शाह यांच्या घरी रात्री १२ ते २ वाजेपर्यंत बैठक घेण्यात आली. यामध्ये देशाची तीन प्रदेशांत विभागणी करून निवडणूक अभियान राबवण्याचे ठरले. तिन्हींची थीम वेगळी असेल आणि धोरणही पूर्णपणे वेगळे राहील.
पहिला प्रदेश हिंदी पट्ट्यातील १० राज्ये, दुसरा ईशान्य आणि तिसरा दक्षिण भारत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षाने जागांच्या दृष्टीने तीन प्रदेशचा फॉर्म्युला तयार केला आहे. चार राज्यांसाठी स्वतंत्र धोरण : गुजरात, पंजाब, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरच्या लोकसभा मतदारसंघांसाठी भाजप स्वतंत्र धोरण आखणार आहे. मोदींसोबत बैठकीत भाजपने ही उद्दिष्टे निश्चित केली. गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांपैकी ८०% जागी विजयाचे अंतर वाढवणे. प. बंगाल, बिहार, ओडिशा या राज्यात जिंकलेल्या जागांची संख्या वाढवणे.
(हेही वाचा – भारताला २०४७ पर्यंत विकसीत राष्ट्र बनवणार – पंतप्रधान मोदी)
तामिळनाडू, केरळ आणि आंध्रमध्ये कमीत कमी २० जागा जिंकणे. एनडीएची व्याप्ती वाढवण्यासाठी दक्षिणेत कनिष्ठ पक्ष बनण्यास हरकत नसणे. दक्षिणेत प्रभावशाली लोकांच्या माध्यमातून हिंदीवादी पक्ष ही प्रतिमा मोडून काढणे. दक्षिणेत लोकसभेच्या १३० जागा आहेत. येथील थीम ‘दक्षिण गौरव’ असेल. यात सांस्कृतिक व भाषिक मूल्यांचे रक्षण, हिंदूंच्या मागास जातींना प्राधान्य देणे, धर्मांतर-तुष्टीकरण या मुद्द्यांवर प्रहार करणे आदींचा समावेश आहे. धोरण ठरवण्यासाठी ८ जुलै रोजी चेन्नईत बैठक होऊ शकते.
ईशान्येतील बंगाल, ओडिशासह ८ राज्यांत भाजप विकासाचा मुद्दा मांडणार आहे. या प्रदेशाची थीम असेल- ‘विकासाचे युग’. प्रादेशिक अस्मिता, घुसखोरी आदी मुद्देही समाविष्ट असतील. ६ जुलैला गुवाहाटीत होणाऱ्या बैठकीत धोरण ठरवले जाईल. हिंदी पट्ट्यासाठी प्रचाराची थीम ‘लाभार्थी मतदार’ असेल. मात्र, फोकस हिंदुत्व-वारसा असेल. याची सुरुवात कशी राहील, हे निश्चित करण्यासाठी ७ जुलैला दिल्लीत प्रमुख नेते मंथन करतील. या १० राज्यांत एकूण २२५ जागा आहेत. पैकी १७७ भाजपकडे आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community