Beed चे पालकत्व चंद्रकांत पाटील यांच्याकडे?

86
Beed चे पालकत्व चंद्रकांत पाटील यांच्याकडे?
  • खास प्रतिनिधी

वादग्रस्त बीड (Beed) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी, अशी मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केली. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात बीडमधील दोन मंत्री असले तरी बीडचे पालकत्व बीडबाहेरच्या मंत्र्याकडे जाणार हे स्पष्ट झाले. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (भाजपा) यांचे नाव आघाडीवर आहे.

पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे

फडणवीस सरकारमध्ये बीड (Beed) जिल्ह्यातील दोन मंत्री असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार) आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (भाजपा) यांचा समावेश आहे. मागील महायुती सरकारमध्ये बीडचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले होते आणि धनंजय मुंडे याच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकत्व होते.

(हेही वाचा – Shatabdi Hospital : गोवंडी शताब्दी रुग्णालयात ईसीजी काढतो सफाई कामगार; माजी नगरसेविकेने आणला प्रकार उघडकीस)

दोन्ही मुंडेंना विरोध

गेल्या काही दिवसांत, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून, बीडमधील (Beed) वातावरण चिघळले आहे. विरोधी पक्षांकडून आंदोलन केले जात आहे तर सामाजिक संघटनाही सक्रिय झाल्या असून मुख्यत्वेकरून बीडमधील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप होत आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही आरोप केले असून त्यांनी धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांना पालकमंत्री पदासाठी विरोध केला आहे.

मुख्यमंत्री राज्याचे पालक

सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे पालक असल्याने त्यांच्याकडे एका जिल्ह्याचे पालकमंत्री पद नसते. त्यामुळे फडणवीस बीडचे पालकमंत्री पद स्वीकारतील, याबाबत शंका असून अन्य मंत्र्यावर ही जबाबदारी देण्यात येणार असण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येते. सध्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील असून हे एक असून त्यांच्यावर बीडच्या (Beed) पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.