दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Assembly Election Result 2025) चित्र आता स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता (BJP) पक्ष सरकार स्थापन करणार आहे. तर भाजपा ४८ जागांवर आघाडीवर असून, आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. याशिवाय दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election 2025) निकालानंतर भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ (MLA Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधत बोचरी टीका केली आहे. यावेळी दिल्लीमध्ये २७ वर्षांनंतर भाजपाची सत्ता आली आहे. (Chitra Wagh)
(हेही वाचा – Delhi Election Result : दिल्लीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताच सचिवालय केले सील; ‘आप’ चे ‘उद्योग’ झाले बंदिस्त )
विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत बोचरी टीका केली आहे. महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. स्वयंघोषित संपादक तथा विश्ववक्ता ‘रडत राऊत’ हे तर कोमातच गेले असतील, अशी बोचरी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. दिल्लीतील विजयानंतर महाराष्ट्र भाजपकडून जल्लोष साजरा केला जात आहे. तर अनेक नेते विरोधकांवर निशाणा साधत आहेत. चित्रा वाघ यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांचा समाचार घेतला.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
शनिवार, ०८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी महाविकास आघाडी पुन्हा एकदा महाभकास आघाडी आहे हे सिद्ध झाले आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. स्वयंघोषित संपादक तथा विश्ववक्ता रडत राऊत हे तर कोमातच गेले असतील. त्यांनी नेहमीप्रमाणे खोटी भविष्य वाणी केली होती. खरंतर त्याला स्वप्न रंजन म्हटले तर योग्य ठरेल, अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. दिल्लीची निवडणूक जिंकणे ही मोदीजींची शेवटची इच्छा आहे, असे हे वाचाळवीर गांजा फुंकून बरळले होते. शनिवारचा निकाल पाहून दिल्लीतील आकाच्या गळ्यात गळे घालून ‘रडत राऊत’ धाय मोकलून रडतील हे नक्की, असा टोला चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला.
आज महाविकास आघाडी पुन्हा एकदा महाभकास आघाडी आहे हे सिद्ध झालं आहे
स्वयंघोषित संपादक तथा विश्ववक्ता रडत रौत हे तर कोमातच गेले असतील..त्यांनी नेहमीप्रमाणे खोटी भविष्य वाणी केली होती… खरंतर त्याला स्वप्न रंजन म्हटलं तर योग्य ठरेल…
तर हे वाचाळवीर गांजा फुंकून बरळले होते की… pic.twitter.com/DtkJsm2adg
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 8, 2025
(हेही वाचा – Bandra Sewage Treatment Plant : प्रकल्पाच्या आड येणाऱ्या २६५ झाडांचे केले पुनर्रोपण)
अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला – CM फडणवीस
दरम्यान, देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दिल्ली विधानसभेवर २७ वर्षांनंतर भाजपाचा झेंडा रोवला गेला. याचा मला अतिशय आनंद आहे. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचे व जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर विश्वास दाखवला. या विजयामुळे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे. त्यांनी सातत्याने खोटी आश्वासने देऊन आणि लोकांची दिशाभूल करत ज्या प्रकारे राज्य केले, त्या परंपरेचा शनिवारी अंत झाला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे.
हेही पाहा –