काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी एकमेव व्यक्ती आहे ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिला पंतप्रधान बनण्याची संधी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर मिळायला हवी होती पण काँग्रेसने (Congress) दिली नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केली. (Ram Kadam)
(हेही वाचा – ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणारच; DCM Ajit Pawar विधानसभेत कडाडले)
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काँग्रेस आंदोलन करत आहे. यावर टीका करताना कदम म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतरत्न (Bharat Ratna) देखील त्यांना मिळायला पाहिजे होतं. पण दिलं नाही 1990 मध्ये व्ही.पी सिंह यांच सरकार आले. त्या सरकारला भाजपाच समर्थन होतं त्यावेळेस डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना भारतरत्न मिळालं. बाबासाहेबांचा कायम द्वेष करणारे लोक पायऱ्यावर बसणार आहेत. आमच्यासाठी बाबासाहेब पुजनीय आहेत. असं विधान भाजपाचे (BJP) आमदार राम कदम यांनी केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community