भाजपाच्या फायरब्रँड नेत्या Navneet Rana ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता 

भाजपा विरूद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता

79
भाजपाच्या फायरब्रँड नेत्या Navneet Rana 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता 
भाजपाच्या फायरब्रँड नेत्या Navneet Rana 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता 

विधानसभा निवडणूकीचा (Vidhan Sabha Election 2024) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. अशातच भाजपाच्या फायरब्रँड नेत्या आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा दर्यापूर विधानसभा (Daryapur Assembly) लढवण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता.  (Navneet Rana)

(हेही वाचा – Fraud : माजी राज्यसभा खासदार यांची एका कथित वकिलाकडून फसवणूक)

दरम्यान, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) बडणेरे मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर दर्यापूर विधानसभेमधूनच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrav adsul) यांचे पुत्र अभिजीत अडसूळ हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे याठिकाणी उमेदवारीसाठी भाजपा विरूद्ध शिवसेना हा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसेच मागील लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि भाजपा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी दौरे, कार्यक्रमाच्या निमित्ताने जनसंपर्क सातत्याने सुरू ठेवला आहे.   (Navneet Rana)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.