दिल्ली निवडणुकीआधी ‘आप’ला धक्का; चंदीगडच्या महापौरपदी भाजपाच्या Harpreet Kaur Babla विराजमान

37
दिल्ली निवडणुकीआधी 'आप'ला धक्का; चंदीगडच्या महापौरपदी भाजपाच्या Harpreet Kaur Babla विराजमान
दिल्ली निवडणुकीआधी 'आप'ला धक्का; चंदीगडच्या महापौरपदी भाजपाच्या Harpreet Kaur Babla विराजमान

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Delhi Assembly Election) भाजपाने (BJP) आपला जोरदार धक्का दिला आहे. चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाने आपला पराभवाची धूळ चारली आहे. या निवडणुकीत आपच्या प्रेम लता यांचा पराभव करून भाजपच्या हरप्रीत कौर बाबला (Harpreet Kaur Babla) या महापौर पदी विराजमान झाल्या आहेत. चंदीगडमध्ये आप (Aam Aadmi Party) आणि काँग्रेस (Congress) एकत्र निवडणुक लढवत असतानाही भाजपने हा धक्का दिला आहे.

( हेही वाचा : BMC : महापालिकेचे व्हिएलटी भूखंडाबाबत नवे धोरण, अनेक संस्थांना पुनर्विकासात होईल मदत आणि महापालिकेच्या महसुलातही होणार वाढ

दि. ३० जानेवारी रोजी झालेल्या मतदानात भाजपा (BJP) उमेदवार हरप्रीत कौर बाबला (Harpreet Kaur Babla)` यांना १९ मते मिळाली तर प्रेम लता यांना फक्त १७ मते मिळाली. ही निवडणूक १ वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात आली आहे. यावेळी निवडणुकीत ही जागा महिलांसाठी राखीव होती. आतापर्यंत आपचे महापौर चंदीगडमध्ये होते.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भाजप (BJP) उमेदवार बाबला यांना इतर पक्षांकडूनही ३ मते मिळाली आहेत. चंदीगड महानगरपालिकेत, नगरसेवक महापौरांची निवड करतात. येथे भाजपचे १६ नगरसेवक आहेत तर आपचे १३ नगरसेवक आहेत. ६ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. काँग्रेस-आपमधील तीन जणांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे सांगण्यात आले.

३५ सदस्यीय चंदीगड महानगरपालिकेत जिंकण्यासाठी १९ मतांची आवश्यकता आहे. चंदीगडचे (Chandigarh) खासदार देखील मतदानात भाग घेतात. ते चंदीगड महानगरपालिकेचे पदसिद्ध सदस्य आहेत. सध्या चंदीगडचे खासदार काँग्रेसचे मनीष तिवारी आहेत. निवडणुकीपूर्वी आप आणि काँग्रेसनेही त्यांच्या नगरसेवकांना शहराबाहेर पाठवले होते. तरीही काही फरक पडला नाही आणि आप-काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. यापूर्वी २०२४ मध्ये झालेली निवडणूक वादात सापडली होती. यापूर्वी भाजपचे उमेदवार मनोज सोनकर यांनी याठिकाणी विजय मिळवला होता.

नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले जिथे अनिल मसीहची फसवणूक उघडकीस आली. आपचे कुलदीप कुमार पुन्हा निवडणूक जिंकले. चंदीगडमध्ये ‘आप’ पुन्हा एकदा सत्तेबाहेर आहे. २०२४ मध्ये ‘आप’चा पराभव करत भाजपने सलग ९ व्यांदा महापौरपद भूषवले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.