भाजपा नेते Kirit Somaiya यांना जीवे मारण्याची धमकी; युसूफ अन्सारीविरोधात गुन्हा दाखल

111
मुंबईत एकही अनधिकृत मशीद राहणार नाही; Kirit Somaiya यांचा इशारा

मुंबईतील मशिदींमधील बेकायदेशीर भोंग्यांविरोधात मोहिम चालवणारे भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)
यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. युसूफ उमर अन्सारी (Yusuf Umar Ansari) असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे, या धमकीनंतर नवघर पोलिस ठाण्यात सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी युसूफ उमर अन्सारीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 351(2) अंतर्गत अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल केला आहे.

( हेही वाचा : ‘मविआ’ मुळे राज्याच्या विकासात बाधा; Chandrashekhar Bawankule यांचा घणाघात)

मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ याने सोमय्या यांना फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर, दि. ७ एप्रिलला भाजपा (BJP) नेत्यांनी मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांची भेट घेतली आणि औपचारिक एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. यापूर्वी, दि. ५ एप्रिल रोजी, भाजपा नेत्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अशाच प्रकारची लेखी तक्रार दाखल केली होती. आरोपीने सोमय्या (Kirit Somaiya) यांना दि. ८ एप्रिल रोजी त्यांना ठार मारण्याचा इशारा दिला होता. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ७२ मशिदींमध्ये परवानगी शिवाय लाऊडस्पीकर वापरल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. भाजपा (BJP) आमदार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी युसूफ अन्सारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील मशिदींवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकरविरुद्ध सोमय्या यांच्या मोहिमेदरम्यान ही धमकी देण्यात आली आहे. (Kirit Somaiya)

“भाजपाच्या नेत्यांनी आज विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांची भेट घेतली आणि युसूफ अन्सारीविरुद्ध (Yusuf Umar Ansari) जलद आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. न्यायालयांनी आधीच लाऊडस्पीकरच्या वापराबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत, ज्यामध्ये विशिष्ट वेळेचे निर्बंध समाविष्ट आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या विषयावर आपली भूमिका व्यक्त केली आहे. तरीही, युसूफ अन्सारी (Yusuf Umar Ansari) जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे धाडस करतात. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असे कोटेचा म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.