- वंदना बर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अशा उमेदवारांना उतरविण्याची योजना आखली आहे ज्यांना बघताच इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) राजकीय पक्षांना मैदान सोडून पळून जावेसे वाटेल. मोदी (PM Narendra Modi) यांना हरविण्यासाठी इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) भाजप उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार उतरविण्याची तयारी करीत आहे. परंतु, मोदी-शहाची जोडी हा डावही उधळून लावणार आहेत. (BJP)
भारतीय जनता पक्षाचे (BJP) लोकसभेतील उमेदवारांची निवड करण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात पोहचले असल्याची चर्चा आहे. निवडणुकीची घोषणा झालेली नाही. परंतु, अयोध्येतील २२ जानेवारीचा सोहळा आटोपल्यानंतर भाजपकडून कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. (BJP)
(हेही वाचा – Bilkis Bano Case : ‘ते’ ११ आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार, सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला अल्टिमेटम)
आधीचा फॉर्मुला वापरणार
महत्वाचे म्हणजे, भाजपने (BJP) यावेळी चारशेपेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित केल आहे. यामुळे उमेदवाराची निवड ही बहुस्तरीय विचार-विनिमय करून केली जात आहे. यात उमेदवाराची क्षमता, लोकसंपर्क, सोशल मिडीयावरील सक्रीयता, मतदारसंघातील लोकांचे मत आणि जिंकण्याची क्षमता आदी सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच उमेदवाराचे नाव निश्चित केले जात आहे. (BJP)
यासाठी भाजपने (BJP) अलिकडेच नमो अॅपवर आपल्या खासदारांबद्दल लोकांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले होते. लोकांकडून मिळालेला अभिप्राय पक्षाने खूप गंभीरपणे घेतला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि खासदारांना मैदानात उतरविण्याचा भाजपचा फॉर्मुला कमालिचा यशस्वी झाला आहे. विद्यमान उमेदवारांच्या जागी नवीन चेहरा देण्याची योजना सुध्दा यशस्वी झाली होती. आता हाच फॉर्मुला लोकसभेच्या निवडणुकीतही अंगीकारला जाणार आहे, असे समजते. (BJP)
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतला तो क्षण)
या उमेदवारांची नावे यादीत असण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आधी ही यादी मकर संक्रांतीनंतर जाहीर केली जाईल अशी चर्चा होती. कारण, पौष महिना सुरू आहे. यात शुभ कार्य करीत नाही असे म्हणतात. परंतु आता ही यादी मकरसंक्रांतीच्या आधी सुध्दा येऊ शकते अशी चर्चा आहे. (BJP)
कारण, भाजपने मागच्या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी पितृ पक्षाच्या काळातच जाहीर केली होती. यानंतरही विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. यामुळे लोकसभेतील उमेदवारांची यादी सुध्दा जाहीर केली जाऊ शकते. मात्र, गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा (BJP) पराभव झाला होता किंवा कामगिरी फारशी चांगली नव्हती अशा मतदारसंघातील उमेदवारांची नावे या यादीत असण्याची शक्यता आहे. उमेदवारांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला ही त्यामागची भूमिका आहे. (BJP)
(हेही वाचा – Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मिळाले राम मंदिराच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याचे आमंत्रण)
नवीन चेहऱ्यांना राज्यसभेत आणायची भाजपची योजना
महत्वाचे म्हणजे, भाजपच्या विरोधात एकच संयुक्त उमेदवार द्यायचा या इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) निर्णयाची हवा निघेल असा उपाय भाजपने केला आहे. सूत्रानुसार, दीर्घकाळापासून राज्यसभेत असलेल्या खासदारांना लोकसभेच्या मैदानात उतरवायचे आणि त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना राज्यसभेत आणायचे अशीही भाजपची योजना आहे. (BJP)
यासाठी भाजपशासित राज्यांतील निवडक राज्यसभा खासदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्याजागी नवीन उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकेल याची पूर्ण व्यवस्था भाजपने केली आहे. याशिवाय राज्यसभेतील ज्या खासदारांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे किंवा लवकरच संपणार आहे त्यांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाणार आहे. एवढेच नव्हे तर, राज्यसभेच्या काही खासदारांनी स्वत:हून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असेही समजते. (BJP)
(हेही वाचा – 2024 Mercedes Benz GLS Facelift : मर्सिडिझची ‘ही’ गाडी आकारानेही वाढली, तर प्रिमिअम सुविधा आणखी सुधारणार)
या नावांची चर्चा
राज्यसभेच्या ज्या खासदारांची नावे चर्चेत आहे त्यात महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि नारायण राणे यांचा समावेश आहे. ओडिशातून धर्मेंद्र प्रधान, गुजरातमधून मनसुख मांडविया, हिमाचल प्रदेशमधून भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि दर्शन सिंग, उत्तर प्रदेशमधून अनिल जैन, सुधांशू त्रिवेदी, डॉ. दिनेश शर्मा, कांता कर्दम, नीरज शेखर आणि सुरेंद्र सिंग नागर, छत्तीसगडमधून सरोज पांडे, केरळमधून व्ही. मुरलीधरन, बिहारमधून राकेश सिन्हा आणि सुशील कुमार मोदी, जम्मू-काश्मीरमधून गुलाम पबी आझाद, राजस्थानमधून अश्विनी वैष्णव, आसाममधून भुवनेश्वर कलिता यांच्या नावांची चर्चा आहे. (BJP)
लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, मध्यप्रदेशातील ज्योतिदरित्य सिंधिया सुमेर सिंग सोलंकी आणि त्रिपुरातील बिप्लब कुमार देब, माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि माजी खासदार सय्यद जफर इस्लाम यांनाही लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्याही खासदाराबाबत लोकांच्या मनात नाराजी असेल तर त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ द्यायचा नाही अशी योजना आखली आहे. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community