राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून आपण सर्व निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता याबाबतच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटासोबत युती करायची की नाही हे स्थआनिक पातळीवर ठरण्यात येईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. मीरा रोड येथे मीरा-भाईंदर भाजपचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.
(हेही वाचाः ‘जर भाजपने ही निवडणूक लढवली असती तर…’,पोटनिवडणुकीतील विजयानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं)
स्थानिक पातळीवर निर्णय होणार
राज्यातील सत्तेत एकत्र आहोत. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिंदे गटाशी युती करण्याचा विचार आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची की नाही हे स्थानिक भाजप कार्यकारिणी आणि कोअर कमिटी ठरवेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रदेश नेतृत्वाकडून होणार शिक्कामोर्तब
भाजप आणि शिंदे गटाने आपली ताकद वाढवायची असून त्याचाच एकमेकांना फायदा होणार आहे. पण स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय झाल्यानंतर त्याबाबत प्रदेश नेतृत्व प्रस्तावाचा विचार करुन युती करायची की नाही हे ठरवेल, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
Join Our WhatsApp Community