विधानसभा निवडणुकीसाठी BJP चा मेगा प्लॅन; गडकरींसह फडणवीस, दानवेंवर मोठी जबाबदारी

193
विधानसभा निवडणुकीसाठी BJP चा मेगा प्लॅन; गडकरींसह फडणवीस, दानवेंवर मोठी जबाबदारी
विधानसभा निवडणुकीसाठी BJP चा मेगा प्लॅन; गडकरींसह फडणवीस, दानवेंवर मोठी जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2024) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) येत्या निवडणुकीसाठी मेगाप्लॅन केला आहे. या माध्यमातून राज्यातील प्रचाराची जबाबदारी पक्षाच्या प्रमुख चार नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. भाजपाच्या चार प्रमुख नेत्यांच्या अंगावर विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची जबाबदारी असणार आहे. भाजपाच्या मेगा प्लॅनमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. (BJP)

नितीन गडकरी संपूर्ण राज्य पिंजून काढणार

विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्यावर विशेष जबाबदारी सोपावण्यात आली आहे. गडकरी हे पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा घेण्याची रणनीती भाजपच्या वतीने आखण्यात आली आहे. त्यामुळे आता नितीन गडकरी हे संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाची चांगली पकड असलेल्या विदर्भात (Vidarbh) देखील भाजपाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. (BJP)

(हेही वाचा – BJP ची गरज संपली; एकनाथ खडसेंना आता मुलीसाठी पुन्हा NCP ची गरज

याच प्रमुख नेत्यांबरोबरच वीस नेत्यांची व्यवस्थापन समिती देखील जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या समितीचे प्रमुख पद देखील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तेच या समितीचे प्रमुख संयोजक असणार आहेत. त्यांच्यासोबत या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजय रहाटकर, प्रवीण दरेकर, अतुल सावे, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश असेल. (BJP)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.