BJP च्या अध्यक्षपदाची धुरा महाराष्ट्राच्या हाती?

483
Assembly Election : आमदार रांजळे यांचे अवघडच ? भाजपामधून बंड, मुंडे ही विरोधात गेले...
  • वंदना बर्वे

भारतीय जनता पक्षाच्या ४५ वर्षांच्या इतिहासात फक्त एका मराठी माणसाला अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. परंतु, आगामी काळात अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा मराठी माणसाच्या गळ्यात पडण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय जनता पक्षात नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. देशभरात सदस्यता मोहिम राबविण्यास सुरवात होण्यासोबतच अध्यक्षाची निवड करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. मात्र, यावेळेस अध्यक्षपदाची धुरा मराठी माणसाला मिळण्याची शक्यता आहे. (BJP)

भाजपाच्या इतिहासात आतापर्यंत ११ अध्यक्ष झाले आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे पहिले अध्यक्ष होत. यानंतर माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जे कृष्णमूर्ती, माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. जे पी नड्डा यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांना जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत सुद्धा संपली आहे. अशात भाजपामध्ये नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अध्यक्षाची निवड करण्यापूर्वी भाजपाकडून देशभरात सदस्यता मोहिम राबविली जाते. ही मोहिम लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. (BJP)

(हेही वाचा – Hoarding Accident : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नोटिसचे पालन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सूचना)

भाजपाच्या नवीन अध्यक्षपदासाठी यांचे नाव चर्चेत 

सूत्रानुसार, भाजपाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे समजते. त्यानंतर सदस्य नोंदणीची मोहिम हाती घेतली जाईल. भाजपाच्या घटनेनुसार नऊ वर्षानंतर प्रत्येक सदस्याला आपल्या सदस्यत्वाची पुनर्नोदणी करावी लागते. सदस्यनोंदणी झाल्यानंतर १ ते ११५ नोव्हेंबर या कालावधीत मंडल अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर जिल्हा अध्यक्षांची निवडणूक १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य आणि केंद्रातील प्रमुख समित्यांच्या निवडी होतील. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडीचाही समावेश असेल. (BJP)

प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया १ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील ५० टक्के प्रदेशाध्यक्षांची निवड पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडीची प्रक्रिया सुरू होते. ही संपूर्ण प्रक्रिया भाजपासाठी महत्त्वाची असून पुढील राजकीय वाटचालीच्यादृष्टीने नवीन दिशा देणारी ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, देशाच्या राजकारणात सर्वाधिक चर्चिला जाणारा प्रश्न म्हणजे भाजपाचे नवे अध्यक्ष कोण असतील? या पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे. यात महाराष्ट्राच्यादृष्टीने एक महत्त्वाचे नाव आहे आणि ते म्हणजे विनोद तावडे यांचे. मात्र, पुढील पाच महिने भाजपामधील संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.