- वंदना बर्वे
आगामी पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष नवीन प्रयोग करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पक्षाचे पारंपरिक मतदार तर पक्षाला मतदान करतात. मात्र, इतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही अनोखे प्रयोग करण्यात येणार आहेत. यामुळे अपारंपरिक मतदार तर भाजपला मतदान करेलच शिवाय जागा वाढतील ते वेगळेच. हा प्रयोग जर यावेळी यशस्वी झाला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील अंमलात आणण्यात येईल, असे म्हटलं जातेय.
विशेषतः अल्पसंख्यांकांचे मत परिवर्तन करण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात येणार आहे. मुस्लिम, ख्रिश्चन या वर्गातील मतदारांना प्रभावित करण्याचे कार्य भाजप कार्यकर्ते जोमात करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मागील निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांचे मन वळवण्याची रणनीती भाजप तयार करत आहे. भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती करण्यात व्यग्र आहे. यासाठी भाजपने १४४ जागांपैकी ५० टक्के मतदारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
(हेही वाचा – State Government Scheme : दिव्यांगांसाठी राज्यशासनाकडून ‘दिव्यांगांच्या दारी’ या योजनेचे आयोजन)
गेल्या निवडणुकीत विरोधात असलेल्या ७ टक्के मतदारांवर विजय मिळवला तर लोकसभा निवडणुकीत २६ अतिरिक्त जागा मिळू शकतात, असा भाजपचा तर्क आहे. भाजपचे एक सरचिटणीस म्हणाले, भाजपने २०१४ च्या निवडणुकीनंतर इतर पक्षांच्या मतदारांशी संपर्क सुरू केला होता. त्याचाच परिणाम म्हणून २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये भाजपला ६.५ टक्के जास्त मते मिळाली. २०१४ मध्ये पक्षाला १७.१ कोटी मते मिळाली होती. तर २०१९ मध्ये २२.६ कोटी मतदान झाले आणि २१ जागा वाढल्या. या लोकसभा निवडणुकीत एकूण ६०.३७ कोटी मते पडली. या वेळी विरोधकांची ७ टक्के मत आपल्या बाजूने वळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यात यश मिळाल्यास गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ३२९ जागा गाठता येतील.
केवळ ७ टक्के विरोधी मतदार हेच लक्ष्य का आहे, याबाबत पक्षाचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, अनेक ठिकाणी काही वैचारिक किंवा जातीयदृष्ट्या बांधिलकी मानणारे मतदार आहेत. ते पक्षाची विचारधारा किंवा जातीय समीकरण पाहून मतदान करतात. काही जण हे नाइलाजाने करतात. परंतु, पारंपरिक पक्षाला सोडून इतर पक्षाला कौल देणारेे मतदार सुमारे ७-१० टक्के असतात. अशा मतदारांवर आमचे लक्ष आहे. मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने राज्यपातळीवर अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community