‘मिशन काश्मीर’ जिंकण्यासाठी BJP ची योजना; संघाचे राम माधव पुन्हा मैदानात

104
Assembly Election : आमदार रांजळे यांचे अवघडच ? भाजपामधून बंड, मुंडे ही विरोधात गेले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2019 च्या ऑगस्ट महिन्यात काश्मीर मधून कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला होता. आता ठीक पाच वर्षानंतर या राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. कलम 370 हटविण्याचा निर्णय योग्य होता? हे सिद्ध होण्यासाठी काश्मीरची निवडणूक जिंकणे भाजपासाठी फार महत्त्वाचे आहे.

जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविल्यानंतर विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षासाठी (BJP) खूप महत्त्वाचे आहे. कारण, कलम 370 हटविण्याचा निर्णय योग्य होता आणि त्यानंतर राज्यात झालेल्या विकासामुळे काश्मीरवासी खुश आहेत, हे दाखवायचे असेल तर भाजपाला निवडणूक जिंकणे आवश्यक आहे.

याची जाणीव भाजपालाही झाली असावी. अन्यथा मागील पाच वर्षांपासून नेपथ्यात गेलेले संघाचे राम माधव यांना अचानक काश्मीरचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमले गेले नसते. राम माधव यापूर्वी काश्मीरात होते आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला होईल असे भाजपला वाटते.

(हेही वाचा – Bangladesh Cricket : बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ; संचालकांचा राजीनामा)

18 सप्टेंबरपासून निवडणुका होणार आहेत

सध्या माधव इंडिया फाउंडेशन नावाच्या थिंक टँकचे अध्यक्ष आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. 90 सदस्यीय विधानसभेसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. कलम 370 मधील बहुतांश तरतुदी रद्द केल्यानंतर जवळपास दशकभरात प्रथमच या पूर्वीच्या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.

कलम 370 हटविल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होय. मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर लडाख हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश बनला आहे. यापूर्वी लडाखच्या चार जागांसह विधानसभेत ८७ जागा होत्या. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर काश्मीरात मतदारसंघाची संख्या ९० झाली. यात जम्मूमधील ४३ आणि काश्मीरमधील ४७ जागांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Badlapur School Case : आंदोलकांच्या दगडफेकीत रेल्वे पोलीस आयुक्तांसह 10 पोलीस जखमी)

भाजपाने (BJP) मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख पदाधिकारी राम माधव यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि तेलंगणातील पक्षाध्यक्ष जी किशन रेड्डी यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. जम्मू-काश्मीरचे प्रभारीपद स्वीकारल्यानंतर राम माधव पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात परतले आहेत.

जेपी नड्डा यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर राम माधव यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले होते. मात्र, आता त्यांना पुन्हा परत बोलाविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, भाजपा आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काश्मीर निवडणुकीच्या मुद्यावर जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा तेव्हा राम माधव यांच्या पुनरागमणावर चर्चा होत होती, असे सूत्राचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Hindustan Post Exclusive News : G 20 शिखर परिषद; ध्वज खरेदीवर सव्वा तीन कोटींचा खर्च)

मुळात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपामध्ये (BJP) दाखल झालेले राम माधव यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2014-19 मध्ये भाजपा आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) यांच्या युतीचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या आघाडी सरकारमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री झाले आणि भाजपाला उपमुख्यमंत्रीपद मिळाले. २०१५ मध्ये भाजपा आणि पीडीपीने मिळून सरकार स्थापन केले होते. पण हे युतीचे सरकार केवळ तीन वर्षे टिकू शकले आणि २०१८ मध्ये पडले होते.

New Project 46 1

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.